मुंबई, 15 जून: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) मंगळवारी महाराष्ट्र (Maharashtra) दौऱ्यावर होते. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातील संत तुकाराम महाराज मंदिराच्या उद्घाटनासह अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले होते. यादरम्यान ते त्यांच्या विमानानं मुंबईत पोहोचले होते. त्यांच्या स्वागतासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही (Chief Minister Uddhav Thackeray) उपस्थित होते. मात्र महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री (Maharashtra Environment Minister) आणि त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना पंतप्रधानांच्या सुरक्षेत तैनात असलेल्या एसपीजीने (SPG) त्यांच्या कारमधून खाली उतरण्यास सांगितले. तेव्हा उद्धव ठाकरेंना विचित्र परिस्थितीचा सामना करावा लागला. आदित्य ठाकरे वडिलांच्या गाडीत बसले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि एसपीजी यांच्यात वाद इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, एसपीजीनं आदित्य ठाकरेंना सांगितले की, व्हीआयपी यादीत तुमचे नाव नसल्यामुळे तुम्ही पंतप्रधानांच्या स्वागतासाठी उद्धव ठाकरेंच्या कारमध्ये जाऊ शकत नाही. गेल्या काही महिन्यांपासून पंतप्रधानांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर फक्त आदित्य ठाकरेच त्यांच्या स्वागतासाठी जातात कारण उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान यांच्यातील संबंध तणावपूर्ण आहेत. मात्र यावेळी त्यांना विचित्र परिस्थितीचा सामना करावा लागला. मात्र या घटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगलेच खवळले. 50 पोलीस, 2 बुलेटप्रूफ गाड्या, व्हिडिओग्राफी; आज सर्वांसमोर येणार लॉरेन्स बिष्णोई यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, आदित्य माझा मुलगा म्हणून पंतप्रधान मोदींचं स्वागत करायला जात नाही आहे. तर राज्याचा मंत्री म्हणून पंतप्रधानांना भेटणार आहे. प्रकरण चांगलेच तापले असताना अखेर एसपीजीने आदित्य ठाकरेंना पंतप्रधानांची भेट घेण्याची परवानगी दिली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींचं स्वागत केलं. पंतप्रधानांच्या महाराष्ट्र दौऱ्यात आदित्य ठाकरे हे INS शिकारा हेलीपोर्टचे प्रोटोकॉल मंत्री देखील होते. चार महिन्यांनी मुख्यमंत्री-पंतप्रधान भेट गेल्या चार महिन्यांपासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्रात आगमन झाल्यावर त्यांचे स्वागत केले नव्हते. हनुमान चालिसा वादानंतर दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याचे मानले जात आहे. अनेक वेळा उद्धव ठाकरे पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी आले नाहीत. याआधी मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात लता मंगेशकर पुरस्कार सोहळा पार पडला तेव्हाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्या कार्यक्रमाला अनुपस्थित होते. याआधी 6 मार्च रोजी पुण्यात मेट्रो रेल्वेच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान गेले असता उद्धव ठाकरे तेथे पोहोचलेच नाहीत. पुन्हा चकमक, पुन्हा दहशतवादी ठार..!, लष्कर-ए-तैयबाच्या 2 दहशतवाद्यांचा खात्मा त्यावेळी सीएम शस्त्रक्रियेनंतर बरे होत असल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात आलं होतं. त्यामुळे पुण्यात आले नाही. याआधी लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्कारप्रसंगी पंतप्रधान आणि उद्धव ठाकरे एकत्र दिसले होते.