सध्या कोरोना विषाणूमुळे देशात भीतीचं वातावरण आहे. त्यातच आता वेगवेगळे बुरशीजन्य आजार होत असल्यानं चिंता आणखी वाढली आहे . देशात अनेक ठिकाणी लॉकडाऊन असल्याने याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होत आहे. देणगीदारांची संख्या घटली असून दत्तक प्रक्रियादेखील अडचणीत सापडल्यामुळे अनाथाश्रम संकटात आले आहेत.