JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / जळगावात दूध संघ अपहार प्रकरणाला नवे वळण, एकनाथ खडसेंना धक्का

जळगावात दूध संघ अपहार प्रकरणाला नवे वळण, एकनाथ खडसेंना धक्का

दुधाच्या भुकटीच्या अपहाराच्या तक्रारी प्रकरणी दूध संघाच्या कार्यकारी संचालकांना पोलिसांनी अटक केली आहे.

जाहिरात

दुधाच्या भुकटीच्या अपहाराच्या तक्रारी प्रकरणी दूध संघाच्या कार्यकारी संचालकांना पोलिसांनी अटक केली आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नितीन चांदूरकर, प्रतिनिधी जळगाव, 15 नोव्हेंबर : भाजपा आमदार मंगेश चव्हाण यांच्या दूध संघात लोणी व दुधाच्या भुकटीच्या अपहाराच्या तक्रारी प्रकरणी दूध संघाच्या कार्यकारी संचालकांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांना धक्का मानला जात आहे. जिल्हा दूध संघात अपहार नसून चोरी झाल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी आरोप केला होता व या प्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल व्हावा यासाठी एकनाथ खडसेंनी पोलीस स्टेशन बाहेर या आंदोलन देखील केले होते. खडसे यांनी रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या दिला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी जयंत पाटील यांनी खडसेंची भेट घेतली, त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. (ठाण्यामध्ये शिंदे-ठाकरे गटात तुफान राडा, एक कार्यकर्ता जखमी, Video) मात्र, आता दूध संघाच्या अपहार प्रकरणी शहर पोलिसांनी दूध संघाचे कार्यकारी संचालक मनोज लिमये यांना अटक केल्याने खडसेंना मोठा धक्का मानला जात आहे. एकनाथ खडसे यांचा मंत्री गिरीश महाजन व गुलाबराव पाटील यांच्यावर निशाणा दरम्यान, जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत भाजप शिंदे गट व महाविकास आघाडी असा आमदार असून दरम्यान महाविकास आघाडीचा एक उमेदवार बिनविरोध झाला असल्याची माहिती एकनाथ खडसे यांनी दिली आहे. मात्र प्रशासनावर भाजप शिंदे गटाकडनं प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत या विरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचेही एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, याप्रसंगी दूध संघाच्या निवडणुकीवरून एकनाथ खडसे यांनी भाजपचे मंत्री गिरीश महाजन व शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली आहे. (जितेंद्र आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा, विरोधकांकडून सुडाचा आरोप, मुख्यमंत्री म्हणतात…) ‘दूध संघातील लोणी खाण्यासाठी दोन्ही मंत्री आपले पाच आमदार घेऊन दूध संघाच्या निवडणुकीत उतरले आहेत. तसंच त्यांच्याकडून सभासदांना प्रलोभन दाखवण्याचा प्रयत्न देखील होत असल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे. ‘विरोधकांनी जे खोके कमवले आहेत त्यातील पैसे सभासदांना देण्याची तयारी ही विरोधकांची असल्याची टीका एकनाथ खडसे यांनी केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या