मुंबई, 8 मे: नारायण राणेंच्या आत्मचरित्रामुळे जर का राजकीय भूकंप येत असेल तर त्याचा सामना करण्यासाठी त्या त्या लोकानी तयार रहावे. आमची खरी बाजू जनतेसमोर येण्यासाठीच हे आत्मचरित्र आहे असं मत नितेश राणेंनी व्यक्त केलं आहे. नारायण राणेंच्या आत्मचरित्रात त्यांनी उद्धव आणि राज ठाकरेंबाबत मोठे गौप्यस्फोट केले आहे.