JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / अजित पवारच होणार उपमुख्यमंत्री? सरकारी हालचालींतून मिळाले संकेत

अजित पवारच होणार उपमुख्यमंत्री? सरकारी हालचालींतून मिळाले संकेत

सरकारी पातळीवरील काही हालचालींनी अजित पवारच उपमुख्यमंत्री होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 3 डिसेंबर : उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन काही दिवस उलटल्यानंतरही अद्याप मंत्रिमंडळाचं खातेवाटप झालेलं नाही. उपमुख्यमंत्रिपद कुणाकडे जाणार, याबाबत राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता आहे. मात्र महाविकास आघाडीने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र सरकारी पातळीवरील काही हालचालींनी अजित पवारच उपमुख्यमंत्री होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. शासनाकडून दालन वाटप करताना मुख्यमंत्र्यांच्या दालनाजवळील सहाव्या मजल्यावरील मुख्य इमारतीतील मोठे दालन अद्यापपर्यंत कुणालाही देण्यात आलेलं नाही. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ खडसे, नंतर भाऊसाहेब फुंडकर हे वापरत असलेले दालन आता रिक्तच ठेवले आहे. हे दालन मुख्यमंत्री दालनानंतर सर्वात मोठे दालन म्हणून ओळखले जाते. मात्र नव्याने सहा मंत्री शपथ घेतलेल्या कोणत्याही मंत्र्याला हे दालन दिलेलं नाही. त्यामुळे अजित पवार यांच्यासाठीच हे दालन रिक्त ठेवण्यात आल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून सुरू असलेलं सत्तानाट्य आता अखेर संपलं आहे. मात्र उपमुख्यमंत्रिपदाबाबत अजूनही ट्विस्ट कायम आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेनंतर राष्ट्रवादीला क्रमांक 3 च्या जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता सर्वाधिक आहे. राष्ट्रवादीतून उपमुख्यमंत्रिपदासाठी अनेक नेते इच्छुक आहे. यामध्ये पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, जयंत पाटील आणि अजित पवार हे तीन नेते आघाडीवर आहेत. मात्र उपमुख्यमंत्रिपद अजित पवार यांच्याकडे जाणार असल्याची माहिती आहे. कारण राष्ट्रवादीत अजित पवार यांचा समर्थक मोठा गट आहे. अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपद मिळावं, यासाठी त्यांच्या समर्थकांचा पक्षावर दबाव आहे. त्यामुले सरकारला स्थिरता आणण्यासाठी राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्रिपदासाठी अजित पवार यांच्या नावावरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या