JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / '..पिक्चर तो पुरी बाकी है'; नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंना इशारा, म्हणाल्या 'त्या कामाची शिक्षा भोगावी लागणार'

'..पिक्चर तो पुरी बाकी है'; नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंना इशारा, म्हणाल्या 'त्या कामाची शिक्षा भोगावी लागणार'

उद्धव ठाकरे यांनी मला जेलमध्ये टाकण्याचं काम केलं, त्याची शिक्षा त्यांना भोगावी लागली. अजून तर फक्त सुरुवात आहे, पिक्चर अजून बाकी आहे अशा शब्दात नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंना इशाराही दिला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

 नितीन नंदुरकर, जळगाव 06  सप्टेंबर : खासदार नवनीत राणा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. मी एक महिला आहे त्याशिवाय 25 लाख लोकांमधून निवडून आलेली खासदारही आहे. त्यामुळे संसदेत बोलत असताना मी फक्त माझ्या मतदारसंघापुरतं नाही, तर देशातल्या महिलेचा आवाज म्हणून बोलत असते. असं असताना उद्धव ठाकरे यांनी मला जेलमध्ये टाकण्याचं काम केलं, त्याची शिक्षा त्यांना भोगावी लागली. अजून तर फक्त सुरुवात आहे, पिक्चर अजून बाकी आहे अशा शब्दात नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंना इशाराही दिला आहे. ‘..तर आता मंत्रिपदाचा राजीनामा देतो’; त्या शब्दावरुन ट्रोल होताच भडकले आरोग्यमंत्री देशात सध्या गाजत असलेल्या लव जिहादचा आपण लवकरच खात्मा करणार असून आपल्याला जेलमध्ये टाकणाऱ्यांना चांगलीच अद्दल घडली आहे. ही तर सुरुवात आहे, पिक्चर तो पुरी बाकी है’ असं म्हणून खासदार नवनीत राणा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना इशारा दिला आहे. जळगाव शहरातील महाराणा प्रताप मित्र मंडळाच्यावतीने गणरायाची आरती आणि हनुमान चालीसा पठणासाठी राणा दाम्पत्य जळगावात दाखल झाले होते. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. हनुमान चालीसा पठण कार्यक्रम करीत असताना देशातील लव जिहाद ह्या मुद्यावर नवनीत राणा बोलल्या. त्या म्हणाल्या की अमरावतीनंतर आज जळगाव जिल्ह्यातून मी सगळ्यांना आवाहन करते की लव जिहाद संदर्भात ज्या ही समस्या आमच्यापर्यंत येतील त्या आम्ही सोडवू. आमच्या कणाकणात हनुमानजी आहेत. त्यामुळे हनुमान चालीसाचे पठण करून राज्यावरचं संकट दूर करणं हा आमचा हेतू होता, असंही त्या म्हणाल्या. ‘मिशन 2024’साठी नितीश दिल्लीत, राहुल गांधींना भेटल्यानंतर आता शरद पवारांकडे! ठाकरेंवर निशाणा साधताना नवनीत राणा म्हणाल्या की, मुख्यमंत्री पदावर असताना उद्धव ठाकरेंनी राज्यातील जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं. ते फक्त फेसबुकच्या माध्यमातून जनतेपर्यंत जात होते. ही महाराष्ट्रासाठी अत्यंत दुर्दैवी बाब होती, अशी टीकाही नवनीत राणा यांनी केली

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या