नाशिक, 15 जानेवारी : शहरी भागातील मुलांना मिळणार चांगल्या दर्जाचे शिक्षण ग्रामीण भागातील मुलांना ही मिळावं. या उद्देशाने नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल दापुर या विद्यालयाने आधुनिक प्रयोगशील वर्गाची निर्मिती केली आहे. राज्यातील ग्रामीण भागात सुरू केलेला हा पहिलाच उपक्रम आहे असल्याचे रयत शिक्षण संस्थेकडून सांगण्यात आले आहे. काय आहेत प्रयोगशील वर्गाची वैशिष्ट्ये? 1. विद्यालयातील विद्यार्थ्यांचे सुंदर हस्ताक्षर होण्यासाठी सुंदर हस्ताक्षर प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. 2. कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांचे वाचन आणि लेखन याची गती काहीशी मंदावली असल्याने वर्गातील विद्यार्थ्यांसाठी वाचन लेखन प्रकल्प राबविला जात आहे. 3. जगामध्ये सर्वत्र बोलली जाणारी इंग्रजी भाषा हिचे ज्ञान मुलांना होण्यासाठी इंग्रजीची भीती नाहीशी होण्यासाठी स्पोकन इंग्लिश हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यातून दररोज परिपाठा प्रसंगी या विद्यार्थ्यांना इंग्रजी मधून संभाषण करायला लावण्यात येत आहे. 4. विद्यार्थ्यांना चार भिंतीचा आत न ठेवता त्यांचं सामाजिक वैश्विक ज्ञान विकसित व्हावं म्हणून त्यांना क्षेत्रभेटीच आयोजन केलं जातं. यामध्ये राष्ट्रीयकृत बँक पतसंस्था या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देत तेथील व्यवहार कसे चालतात याचा अनुभव मुलांना दिला जातो. 5 . मुलांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी दर शनिवारी त्यांना प्रेरित करणारा एक लघुपट दाखविला जातो. डिजिटल प्रोजेक्टरच्या माध्यमातून वेगवेगळे प्रेरणादायी व्हिडिओज मुलांना दाखविले जातात. रंगकाम करणाऱ्या मजुराची मुलगी झाली उद्योग निरीक्षक! पाहा Video 6. वर्गात कला दालन देखील आहे. मुलांना वर्गातच सर्व रंगाचं साहित्य उपलब्ध आहे. प्रत्येक मुलाला स्वतंत्र पॅड कागद दिला जातो. त्यावरती वेगवेगळ्या सुंदर अशा चित्राकृती साकार कृतीपत्रिका तयार केल्या जातात. यातून मुलांना चांगले रंग चांगला कागद चांगलं साहित्य या माध्यमातून उत्तम कलाकृती साकार करण्याचा सुंदर अनुभव मुलांना येतो. 7. वर्गामध्ये 2000 पुस्तक बसतील इतकं मोठं ग्रंथालय वर्गामध्ये तयार करण्यात आलेले आहे. ज्यामध्ये आज 300 ते 400 पुस्तक वर्गात उपलब्ध आहेत. मुक्त ग्रंथालय मध्ये ज्यामध्ये कथा कविता ललित पत्रलेखन निबंध लेखन वेगवेगळ्या महापुरुषांच्या चरित्र विज्ञानासंदर्भात सर्व पुस्तक मुक्त ग्रंथालयात उपलब्ध आहेत. 8. विज्ञानाच्या वेगवेगळ्या खेळण्या विद्यार्थी स्वतः तयार करतात. यातून त्यांना स्वनिर्मितीचा आनंद निश्चितच मिळतो. तसेच त्यांच्यामध्ये असणारी कारागिरी कलाकुसर या कलागुणांना वाव मिळतो. 9. वर्गामध्ये प्रवेश करताच डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांचे अभिवादन स्थळ पाहायला मिळते. यासोबतच बाजूला खडू फलक आणि डिजिटल फलकाचे सुद्धा दर्शन आपल्याला घडतं वर्गात सुंदर असा प्रोजेक्टर विद्यार्थ्यांसाठी बसवलेला आहे. चित्रपट बघताना त्याचा स्पष्ट आवाज यावा एमपी थेटर मध्ये बसल्याचा फील व्हावं. यासाठी खिडक्यांना स्लाइडिंग काचेच्या बसवलेले आहे. जेणेकरून बाहेरचा कुठलाही आवाज वर्गात व्यत्यय आणत नाही.
मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावं यासाठी आमचा प्रयत्न ग्रामीण भागातील मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावं. यासाठी आमचा प्रयत्न आहे. विद्यार्थ्यांना एका वर्गामध्ये या सर्व गोष्टी पुरविल्या जातात. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निश्चितच आनंदाचे वातावरण आहे. प्रत्येक विद्यार्थी हा वेगवेगळ्या विषयांमध्ये आपल्याला पुढे जाताना दिसत आहे. तीन वर्ष हे विद्यार्थी एकाच वर्गात असतील पाचवी ते आठवी पर्यंत याच वर्गात विद्यार्थी शिकतील. प्रत्येक विद्यार्थ्यांवरती नाविन्यपूर्ण वेगवेगळे प्रयोग करून त्यांना शिक्षणाचा आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांना प्रोत्साहन देऊन पुढे नेण्याचं काम या प्रयोगशील वर्गाच्या माध्यमातून केले जात आहे. Video : शिवाजी महाराजांपासून मिळाली तलवारबाजीची प्रेरणा, औरंगाबादच्या वैदेहीनं पटाकवलं गोल्ड विद्यार्थी हा ढ असतो, मठ्ठ असतो ही संकल्पना तीन वर्षांमध्ये संपूर्णतः पुसून टाकण्यात येईल. विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये निपुण कसे होतील यासाठी सर्व विद्यालयातील सेवक हे प्रयत्न करताना आपल्याला दिसत आहेत. या वर्गाची अत्यंत आगळीवेगळी कल्पना जी महाराष्ट्रातील इतर शाळांना सुद्धा निश्चितच प्रेरणादायी असेल यात शंका नाही अशी प्रतिक्रिया शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब गुंजाळ यांनी दिली आहे.