JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Nashik ST Bus Accident : नाशिकमध्ये एसटी बसचा थरारक अपघातात 5 जणांना चिरडलं, घटनेचा Live Video

Nashik ST Bus Accident : नाशिकमध्ये एसटी बसचा थरारक अपघातात 5 जणांना चिरडलं, घटनेचा Live Video

नाशिक महामार्गावरील शिंदे पळसे टोल नाक्याजवळ तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. अपघातात एसटी बसने तीन ते चार दुचाकीस्वारांना चिरडले आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लक्ष्मण घाटोळ (नाशिक) 08 डिसेंबर : नाशिक सिन्नर महामार्गावर अपघातांची मालिका काही केल्या संपायच नाव घेत नाही. मागच्या आठवड्यात कारच्या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आता पुन्हा भीषण अपघात झाला आहे. शिंदे पळसे टोल नाक्याजवळ तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. अपघातात एसटी बसने तीन ते चार दुचाकीस्वारांना चिरडले आहे. हा अपघात इतका भीषण होता की अपघातानंतर एसटी बसने पेट घेतला आहे. या अपघातात 4 ते 5 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

हे ही वाचा :  सीएम शिंदेंच्या ठाण्यात गोळीबाराचा थरार; व्यावसायिक गणेश कोकाटेची हत्या

आठवड्यात दोन घटना

संबंधित बातम्या

मागील पंधरवाड्यात झालेल्या अपघातात सिन्नर येथील सायकलवर जाणाऱ्या साई भक्तांना एका कारने चिरडले होते. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात होती. ही घटना ताजी असतांनाच पुन्हा याच मार्गावर पुन्हा एक भीषण अपघात झाला आहे. मुंबई येथील राहणारे साईभक्त हे शिर्डीला गेले होते, साईबाबांचे दर्शन करून ते त्र्यंबकेश्वरच्या दर्शनाला चालले होते.  

जाहिरात

हे ही वाचा :  रन काढताना मैदानातच कोसळला क्रिकेटर, 16 वर्षांच्या खेळाडूचा धक्कादायक मृत्यू

त्यातच सिन्नर ते शिर्डी राष्ट्रीय महामार्ग असलेल्या देवपुर जवळ सकाळी सात वाजेच्या दरम्यान भीषण अपघात झाला आहे. टायर फुटल्याने तवेरा जीप उलटली आणि बाजूच्या खड्ड्यात जाऊन उलटली होती. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला असून इतर सात साई भक्त गंभीर जखमी असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या