नाशिक, 06 डिसेंबर : नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे आज नाशिक जिल्ह्यातील विविध ठिकाणी भेटी गाटी देत आहेत. यावेळी ते नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा येथील गावकरांची भेट घेतली. यावेळी तेथील नागरिकांची पालकमंत्री दादा भुसे यांच्यासह शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय येथे पार पडली. या बैठकीत सुरगाणा येथील विलीनीकरण संघर्ष समितीच्या वतीने समस्यांचा पाढा वाचण्यात आला. दरम्यान यावेळी त्याठिकाणी राष्ट्रवादीचे आमदार नितीन पवार यांच्यासह काहीजण उपस्थित होते. दादा भुसे आणि आमदार पवार यांच्या जोरदार खटके उडाले आहेत.
पालकमंत्री दादा भुसे आणि राष्ट्रवादीचे आमदार नितीन पवार यांच्यात खटके उडाले आहेत. यावेळी दादा भुसे यांनी मलाही राजकारण करता येत दादा भुसे तुम्ही मला शिकवू नका अशा शब्दात बोलत भर बैठकीत आमदार पवार यांना दम भरल्याने जोरदार खडाजंगी झाली. सुगराणा येथे झालेल्या बैठकीत रस्ता, आरोग्य सुविधा, पाणी, वीज नसल्याने गुजरातला जाऊ देण्याची विनंती केली. यावरून आमदारांसह काही ग्रामस्थ होते यावेळी हा प्रकार घडला.
हे ही वाचा : ज्यांना भरभरून दिले त्यांनीच कोकणावर अन्याय केला, फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
आमचा विकास करून घ्या, अन्यथा आमचा मार्ग मोकळा करून द्या अशी सुरगाणा ग्रामस्थांनी पालकमंत्री दादा भुसे आणि प्रशासनाला विनंती केली होती. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, सुरगाणा उपजिल्हा रुग्णालय व्हावे, प्रस्तावित असलेले उंबरठाण ग्रामीण रुग्णालय व्हावे, रोजगार हमी योजना कागदावर राहू नये, पावसाळ्यात खड्डे डांबराने भरावेत, तात्पुरती मलमपट्टी नको, 108 अम्ब्युलन्स नाही, उपलब्ध व्हावी, चांगल्या दर्जाची प्राथमिक शाळा द्यावी, नॅशनल बँका नाही, त्या बँका व्हाव्यात, पाण्याची व्यवस्था व्हावी या मागण्या करण्यात आल्या.
पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर देखील ग्रामस्थांनी आंदोलन मागे न घेतल्याने गोंधळ उडाला होता. यावेळी पालकमंत्री यांनी राष्ट्रवादीचे आमदार नितीन पवार यांना सुनावले. ‘हे बरोबर नाही’ आम्हालाही राजकारण करता येते अशा शब्दात दादा भुसे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केल्याने काही काळ वातावरण तणावाचे बनले होते. काही काळानंतर वातावरण शांत झाले यावेळी आंदोलकांनी माघार घेतली.
हे ही वाचा : सीमावाद पेटला! कन्नड रक्षण वेदिका संघटनेचा महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ला
यावेळी अधिकाऱ्यांना धारेवर धरत ऑफिसमध्ये बसून पाट्या टाकू नका, गावात जाऊन गावकऱ्यांच्या मागण्या काय आहेत ते बघा असा दमच भुसे यांनी भरला. भुसे यांनी या सर्व समस्यांच्या बाबतीत जे अधिकारी उपस्थित होते त्यांना तात्काळ सूचना देत प्राधान्यक्रमाने कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहे. अधिकाऱ्यांना झापत पालकमंत्री दादा भुसे यांनी नाराज ग्रामस्थांना वेळ द्या सगळीकामे पूर्ण करू असं आश्वासन दिले आहेत.