JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मुस्लिम मुलींनी हिंदू तरुणांसोबत लग्न केलं, मग तो कोणता जिहाद? अबू आझमींचा भाजपला सवाल

मुस्लिम मुलींनी हिंदू तरुणांसोबत लग्न केलं, मग तो कोणता जिहाद? अबू आझमींचा भाजपला सवाल

आझमी यांनी मालेगावात सभा घेऊन आगामी महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले.

जाहिरात

आझमी यांनी मालेगावात सभा घेऊन आगामी महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मालेगाव, 11 नोव्हेंबर : मुस्लिम तरुणांसोबत हिंदू मुलींनी लग्न केले तर त्याला लव्ह जिहादचं नाव दिलं जातं. मग अनेक ठिकाणी मुस्लिम मुलींनी हिंदू तरुणांसोबत लग्न केले आहे त्याला कोणतं जिहाद म्हणाल? असा थेट सवाल समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी यांनी केला आहे. समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू हाशिम आझमी यांनी मालेगावात सभा घेतली होती. यावेळी लव्ह जिहाद, अफजल खान कबरी जवळ अतिक्रमण प्रकरणासोबत एमआयएम युती यासह इतर मुद्द्यावर मत व्यक्त केले. तसंच, आझमी यांनी मालेगावात सभा घेऊन आगामी महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले. (नाशिकने वाढवलं शिंदेंचं टेन्शन! दादा भुसेंच्या बैठकीला सुहास कांदेंची दांडी) यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना अफजल खान कबरी जवळ काढण्यात आलेले अतिक्रमण आणि महापालिका निवडणुकीत एमआयएम सोडून इतर कोणत्याही पक्षासोबत युती करणार असल्याचे मत व्यक्त केले. (‘मागच्या 11 वर्षात काय काय भोगलं?’, शिंदेंकडे जातच गजानन किर्तीकरांचा ठाकरेंवर घणाघात) लव्ह जिहाद बाबत बोलताना अबू आझमी यांनी मुस्लिम तरुणांसोबत हिंदू मुलींनी लग्न केले तर त्याला लव्ह जिहादचं नाव दिलं जातं मग अनेक ठिकाणी मुस्लिम मुलींनी हिंदू तरुणांसोबत लग्न केले आहे. त्याला कोणतं जिहाद म्हणाल, असा प्रश्न आझमी उपस्थित केला. ‘अफजल खानच्या कबरी जवळचं अतिक्रमण काढण्यात आल्याबाबत मत व्यक्त करताना अबू आPमी म्हणाले की, शिवाजी महाराजांच्या सैन्यात अनेक मुस्लिम तरुण होते तर औरंगजेबच्या सैन्यात हिंदू होते. त्यावेळी ज्या लढाया झाल्या. त्या धार्मिक नव्हत्या राजा-राजामधील ते युद्ध होते मात्र आता त्याला हिंदू-मुस्लिम असे स्वरूप दिले जात आहे, असंही आझमी म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या