JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / ऋषिकेश रिकामे : जादुई आवाजाचा तरुण कसा बनला सोशल मीडियावर स्टार? पाहा Video

ऋषिकेश रिकामे : जादुई आवाजाचा तरुण कसा बनला सोशल मीडियावर स्टार? पाहा Video

आपल्या सुमधुर अवाजाने गायक ऋषिकेश रिकामे याने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. सोशल मीडियावर चर्चेत आलेल्या ऋषिकेश रिकामेबद्दल जाणून घ्या.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नाशिक 03, नोव्हेंबर : सोशल मीडिया म्हटले की सध्या एखादा व्हिडीओ चर्चेत येण्यास फारसा वेळ लागत नाही. यातच सध्या इंटरनेटवर एका सुमधुर आवाजाची खूप चर्चा होतीय. तो म्हणजे  गायक ऋषिकेश रिकामे याच्या ऋषिकेशच्या आवाजाने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्रामवर ऋषिकेशनी गायलेली अनेक गाणी,अभंग मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. सोशल मीडिया मुळे अवघ्या काही दिवसात ऋषिकेशला चांगली पसंती मिळाली आहे. चला तर जाणून घेऊया सोशल मीडियावर चर्चेत आलेल्या ऋषिकेश रिकामेबद्दल. ऋषिकेश रिकामे हा मूळचा नाशिक जिल्ह्यातील विंचूरगवळी या गावचा आहे. वडील बाळकृष्ण रिकामे हे शेतकरी आहेत. संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह हा शेतीवर चालतोय. वडिलांना ही लहानपणापासून गायनाची आवड आहे. ते गायन,पखवाज वादण देखील करतात. मात्र घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांना संगीताचे शिक्षण घेता आले नाही. परंतु आपण जरी क्लासिकल शिक्षण घेतल नाही तरी आपल्या मुलाने स्वप्न पूर्ण करावी अशी त्यांची इच्छा होती.

सोशल मीडियावर व्हायरल झालेली डान्सर गौतमी पाटील कोण आहे? पाहा Inside Story

अशी झाली गायन सुरुवात  वडील कीर्तनाला,भजनाला गावोगावी जायचे तेव्हा ऋषिकेशला घेऊन जात असत. त्यामुळे हळूहळू त्याला आवड निर्माण झाली. अभंग,गौळणी कानावर पडत असल्यामुळे ऋषिकेश ही हळूहळू गायन करू लागला. वडिलांनी शास्त्रीय गायन शिकवण्यास सुरुवात केल्यावर ऋषिकेशचा आवाज आणि आत्मसात करण्याची क्षमता चांगली असल्याचं बघितल्यानंतर त्यांनी गायक आनंद अत्रे आणि सोनाली भुसारे यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेण्यास पाठवले आणि आता सुंदर प्रकारे ऋषिकेश गायन करत आहे. कोरोना काळात सोशल मीडियावर व्हिडिओ टाकायला सुरुवात ऋषिकेशचा आवाज हा सर्वांनाच संगीताच्या प्रेमात पाडतो. मात्र ऋषिकेशच्या गाण्यांना अभंगाना खरी प्रसिध्दी ही कोरोना काळात मिळाली. त्याने निसर्गाच्या सानिध्यात गायलेल, ‘चांद सुगंधा येईल रात उसासा देईल’.. हे गाणं मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून युट्यूबवर अपलोड केलं आणि बघता बघता लाईक,कमेंट्स,शेअरचा त्या गाण्यावर पाऊस पडला. लाखो व्ह्यूज त्या गाण्याला मिळाल्यामुळे ऋषिकेशने अनेक गाणी,अभंग रेकॉर्ड करून युट्यूबवर अपलोड केली आणि यांना नेटकर्यांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. माझ्या देवा, तरारू, मागू कसा मी, जीव रंगला, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, इंद्रायणी काठी, कानडा राजा पंढरीचा, माऊली माऊली, आनंद हरपला, आप की नाजरोने समझा हे गाणे ऋषिकेशचे सोशल मीडियावर प्रसिद्ध आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला लोकलमधील भजन गायक कोण आहे? पाहा Video

संबंधित बातम्या

वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्याची होती जिद्द मुळात शेतकरी कुटुंबात आपला जन्म झाला आहे. वडील दररोज शेतात राब राब राबतात. त्यांचं स्वप्न होत चांगला गायक होण्याचं मात्र परिस्थिती अभावी त्यांना संगीताचे शिक्षण घेणे शक्य झाले नाही. अशातच आपल्या मुलाने तरी शिकून मोठ व्हावं नाव कमवाव आणि आपली स्वप्न पूर्ण करावं असं सतत त्यांना वाटायचं आणि त्यांची तळमळ बघता मी ही विचार केला की वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी संगीत क्षेत्रात तरबेज व्हायचं. आणि नंतर मी आनंद अत्रे सोनाली भुसारे यांच्याकडे संगीताचे धडे गिरवू लागलो. चांगल शिक्षण त्यांच्याकडून मिळालं. सोशल मीडियावर लोकांचा भरघोस मिळणारा प्रतिसाद हा अजून चांगल काम करण्याचा उस्फुर्तपणा देत होता. माझ्या आवाजाची दखल घेत काही चित्रपटांमध्ये पार्श्वगायन करण्याची संधी मिळाली अतिशय सुंदर प्रवास माझा सुरू आहे. अजून चांगल शिकून खूप मोठं होण्याची इच्छा असल्याची प्रतिक्रिया गायक ऋषिकेश रिकामे याने दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या