JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Diwali 2022 : एक दिवाळी अशीही अनाथ मुलांसोबत साजरा केला दीपोत्सव, VIDEO

Diwali 2022 : एक दिवाळी अशीही अनाथ मुलांसोबत साजरा केला दीपोत्सव, VIDEO

Diwali 2022: आधारतीर्थ या आश्रमात उधाण युवा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने दीपोत्सव साजरा करण्यात आला.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नाशिक, 24 ऑक्टोंबर : देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होणारा सण  दिवाळी म्हणजे दीपोत्सव. मात्र, आजही समाजातील अनेक घटक असे आहेत ज्यांच्या आयुष्यात वर्षभर अंधारच असतो. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर रोडवर असलेल्या आधारतीर्थ या आश्रमातील आत्महत्याग्रस्त शेतकरी मुलांच्या आयुष्यात सुखाचा प्रकाश यावा म्हणून उधाण युवा बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जगदीश बोडके यांच्या संकल्पनेतून दीपोत्सव साजरा करण्यात आला. नेहमीच समाजातल्या तळागाळात जाऊन आनंदाचे क्षण घेऊन पोहोचणाऱ्या उधाण सामाजिक संस्थेने यंदा या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या अनाथ मुलांची दिवाळी गोड केली आहे. दिवाळी हा सण गोड व्हावा म्हणून उधाण दरवर्षी वंचित घटकांसाठी उपक्रम राबवून शेकडो लोकांच्या जीवनातील तिमिराला प्रकाशाची वाट दिली आहे. याही वर्षी वायफळ खर्च न करता उधाण सामाजिक बहुद्देशीय संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत विविध कार्यक्रम आणि उपक्रम या ठिकाणी पार पाडले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला या आश्रमातील मुलांनी स्वागत गीत सादर करून उधाण मधील सर्व पदाधिकाऱ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत केले. त्याचबरोबर महामृत्युंजय मंत्र, कालभैरव अष्टक देखील यावेळी विद्यार्थ्यांकडून सादर करण्यात आले. यानंतर उधाण बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने या विद्यार्थ्यांना दिवाळीच्या निमित्ताने विविध फराळाच्या पदार्थांचे वाटप करण्यात आले. हेही वाचा :  Nashik : झणझणीत मिसळसह खा भजे, नाशिकमध्ये मिळतंय भन्नाट कॉम्बिनेशन, Video या मुलांना शैक्षणिक हातभार लाभावा म्हणून शैक्षणिक साहित्य वाटप देखील करण्यात आलं. तसेच सर्वांनी एकत्र येत यावेळी फटाक्यांची आतिषबाजी देखील केली. यावेळी या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात मावेनासा झाल्याचं बघायला मिळालं, अशी प्रतिकिया उधाण युवा बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जगदीश बोडके यांनी यावेळी दिली. आमच्या आई वडिलांचे छत्र हरपलं तेव्हापासून आम्ही या ठिकाणीच राहतो. दिवाळीनिमित्ताने उधाणच्या वतीने आमच्या जीवनातील दिवाळी प्रकाशमय व्हावी. म्हणून करण्यात आलेला हा छोटासा प्रयत्न आमच्यासाठी लाखमोलाचा असल्याची भावना यावेळी विद्यार्थ्यांनी बोलून दाखवली. हेही वाचा :  Video : शेतकऱ्यांची दिवाळी गोड नाहीच, कवडीमोल भावानं फुलांची विक्री! दरम्यान, समाजाने पाठ फिरवलेल्या वंचित घटकांसाठी व प्रत्येक व्यक्तीमधील सामाजिक बांधिलकीची भावना जागृत करण्यासाठी उधाण ग्रुपची मुहूर्तमेढ रवण्यात आलेली आहे.  स्वर्गीय श्री पांडुरंग पंडितराव बोडके काळाराम मंदिराचे माजी विश्वस्त यांच्या प्रेरणेतून मार्गदर्शन सहकार्यातून स्थापना केली गेली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या