JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मोठी बातमी, अमोल कोल्हे राष्ट्रवादीत नाराज? शिर्डीच्या शिबिराकडे फिरवली पाठ

मोठी बातमी, अमोल कोल्हे राष्ट्रवादीत नाराज? शिर्डीच्या शिबिराकडे फिरवली पाठ

हिंदुत्व आणि शिवाजी महाराजांची कार्यपद्धती विषयावर मांडणी अमोल कोल्हे बोलणार होते. पण अमोल कोल्हे या कार्यक्रमाला गैरहजर आहे

जाहिरात

हिंदुत्व आणि शिवाजी महाराजांची कार्यपद्धती विषयावर मांडणी अमोल कोल्हे बोलणार होते. पण अमोल कोल्हे या कार्यक्रमाला गैरहजर आहे

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

शिर्डी, 05 नोव्हेंबर : सत्तेतून पायउतार झाल्यानंतर राष्ट्रवादीचा मंथन शिबीर शिर्डीमध्ये होत आहे. तब्येत ठीक नसताना सुद्धा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे हॉस्पिटलमधून शिर्डीकडे रवाना झाले आहे. पण, या शिबिराकडे राष्ट्रवादीचे फायरब्रँड खासदार अमोल कोल्हे यांनी पाठ फिरवली असल्याचे समोर आले आहे. शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं मंथन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराला सर्व प्रमुख नेते आणि खासदार हजर आहे. पण, या शिबिरात पक्षाचे फायर ब्रँड नेते खासदार अमोल कोल्हेंची मंथन शिबिराकडे पाठ फिरवली आहे.

हिंदुत्व आणि शिवाजी महाराजांची कार्यपद्धती विषयावर मांडणी अमोल कोल्हे बोलणार होते. पण अमोल कोल्हे या कार्यक्रमाला गैरहजर आहे. पक्षातील कार्यपद्धतीवर कोल्हे नाराज असल्याची सूत्रांची खात्रीशीर माहिती समोर आली आहे. कोल्हे यांच्या अनुपस्थिती बाबत पक्षातील नेत्यांनी मात्र मौन बाळगलं आहे. विशेष म्हणजे, आज शिबिराचा शेवटचा दिवस आहे, पण शेवटच्या दिवशीही कोल्हे आले नाही. याआधीही कोल्हे यांनी पक्षाविरोधात भूमिका घेतल्यामुळे वाद निर्माण झाला होता. ( शिंदे गटाचा उठाव झाला नसता तर राष्ट्रवादी भाजपसोबत..’; गुलाबराव पाटलांचा दावा ) दरम्यान, या शिबिरात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या भाषणातून भाजप आणि शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. भोंगे बंद करण्याचा निर्णय घेताना विचार केला नाही. त्याचा परीणाम काय होणार..? गेले मशिदीवरचे भोंगे बंद करायला आणि साईबाबांच्या मंदिरावरचा भोंगा बंद झाला, असं म्हणत सुळे यांनी मनसेला टोला लगावला. (नवाब मलिकांना धक्का, साम्राज्याला लागणार टाळे, ईडी जप्त करणार मालमत्ता) गेल्या वर्षभरात पन्नास हजार कोटी रूपये स्वच्छ भारत अभियानासाठी घालवले. स्मार्ट सिटी आणि अमृत सिटी योजनेत लाखो कोटीचा खर्च केले. मात्र त्याचा काय परीणाम झाला हे दिसत नाही. त्याचं ऑडिट कोण करणार आहे ? चौवीस तास चॅनल चालवायचा आपण काय मक्ता घेतलाय का? का आपण उत्तर द्यायचं. राजकारण आणि मीडियाचं नाते आहेच. ते संबध चांगले ठेवावे लागतात. मात्र त्यांनी आपल्यावर टीका करायलाच हवी. मीडिया आणि राजकारण याचा संबंध असावा मात्र त्यात प्रलोभन आणि धाक नसावा. पन्नास खोके घेतल्याचं कोणीही म्हणत नाही घेतले नाही म्हणून, गावागावात गेल्यावर लोक त्यांना विचारत आहेत. मात्र ते त्यावर काहीही बोलत नाही. गिफ्ट घेऊन विरोधात बातम्या छापत नसल्याचा आरोपच सुळे यांनी केला. विरोधात बसायला का घाबरता. अनेक वर्षे सत्तेत होतो त्यामुळे तुम्हाला वाटत असेल सत्ता असेल तरच काम होतात. जितके लोक बारामतीत येतील त्यांचे स्वागतच आहे. पण दिल्लीत बसून काय तारे तोडताहेत, असं म्हणत भाजपच्या मिशन बारामतीवर सुप्रिया सुळे यांनी टीका केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या