JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / नाशकात कोरोनाचा कहर! 4 दिवसांत 25 जणांचा मृत्यू, पॉझिटिव्ह रुग्णांनी गाठला उच्चांक

नाशकात कोरोनाचा कहर! 4 दिवसांत 25 जणांचा मृत्यू, पॉझिटिव्ह रुग्णांनी गाठला उच्चांक

मुंबई, पुणे पाठोपाठ आता नाशिक शहरात कोरोना विषाणूनं कहर केला आहे.

जाहिरात

गेल्या 3 महिन्यात रुग्णसंख्येत 5 पटीने वाढ झाली आहे. शिवाय मृत्यूदरदेखील 3 पटीने वाढला असून 680000 पर्यंत पोहोचला आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नाशिक, 20 जून: मुंबई, पुणे पाठोपाठ आता नाशिक शहरात कोरोना विषाणूनं कहर केला आहे. शहरातील रुग्णांचा आकडा एक हजार पार म्हणजे 1052 झाला आहे. 24 तासांत नवे 154 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून तिघांचा मृत्यू झाला आहे. चिंतेची बाब म्हणजे कोरोनामुळे 4 दिवसांत 25 बळी गेला आहे. हेही वाचा… लॉकडाऊन आणखी वाढणार! लवकरच निर्णय, महापौर म्हणाले… जान है तो जहान है नाशिक जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांचा आतापर्यंतचा आकडा 2516 झाला असून 153 जणांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे मालेगावमध्ये एकही रुग्ण दिवसभरात आढळून आला नाही. मालेगाव पिछाडीवर मालेगाव शहराने कोरोना रुग्णांबाबत रेकॉर्ड केल्याने राज्यभर त्याची जोरदार चर्चा सुरु झाली होती. पण आता नाशिक शहर तर मालेगावला ओव्हरटेक करुन अत्यंत वेगाने पुढे जात आहे. त्याच प्रमाणात ग्रामीणमध्येही रुग्णांची संख्या गतीने वाढत आहे. त्याचा परिणाम जिल्ह्यातील रुग्णसंख्येवरही होत आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आता वेगाने प्रयत्न सुरू केले आहेत. 9 दिवसांत तब्बल 552 रुग्ण आढळले… नाशिक शहरात पहिला रुग्ण आढळल्यानंतर पहिली 500 रुग्णसंख्या पूर्ण होण्यासाठी 69 दिवसांचा कालावधी लागला. मात्र, नंतर 500 ते हजार हा टप्पा अवघ्या 9 दिवसांत गाठला गेला. या 9 दिवसांत तब्बल 552 रुग्ण आढळून आले आहेत. त्यातुलनेत पहिले पाचशे रुग्ण होण्यासाठी दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लागला आहे. 6 एप्रिल रोजी नाशिक शहरात पहिला रुग्ण आढळून आला होता. तर 500 रुग्ण संख्या ही 10 जून रोजी म्हणजे ९ दिवसांपूर्वीच झाली होती. आता 19 जूनला ती 1052 इतकी झाली आहे. लॉकडाऊन वाढणार? नाशिक शहरातही कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर शहर आणखी 10 दिवस लॉकडाऊन करावं, अशी मागणी महापौर सतीश कुलकर्णी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. हेही वाचा…  लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर देशात कोरोनाचा विस्फोट? तरी महाराष्ट्राची ही आकडेवारी दिलासादायक महापौर म्हणाले, शहरातील परिस्थिती गंभीर आहे. परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर काही होऊ शकत नाही. आम्ही लॉकडाऊनचा निर्णय घेऊ शकतो, पण शासनाशी विचार विनिमय झाल्यास योग्य होईल. जान है तो जहान है. नागरिक वाचलेच नाहीत तर अर्थकारणाला काय करणार, असा सवाल महपौर यांनी उपस्थित केला आहे. नियम पाळावे हे नाशिककरांना आवाहन त्यांनी केलं आहे. शहर लॉकडाऊन करण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असंही महापौर सतीश कुलकर्णा यांनी सांगितलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या