JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / BJP ला मोठा हादरा; नंदुरबार जिल्हा परिषदेवर मविआची सत्ता, भाजपच्या जागा घटल्या, पाहा कुणाला मिळाल्या किती जागा

BJP ला मोठा हादरा; नंदुरबार जिल्हा परिषदेवर मविआची सत्ता, भाजपच्या जागा घटल्या, पाहा कुणाला मिळाल्या किती जागा

Nandurbar ZP Election result: नंदुरबार जिल्हा परिषदेच्या सर्व जागांचे निकाल जाहीर झाले आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

निलेश पवार, प्रतिनिधी नंदुरबार, 6 ऑक्टोबर : नंदुरबार जिल्हा परिषदेच्या (Nandurbar ZP Election Result) सर्वच्या सर्व म्हणजे 11 जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत भाजपला (BJP) झटका बसला आहे कारण त्यांच्या जागा तीनने कमी झाल्या आहेत. या निवडणुकीत शिवसेना (Shiv Sena) आणि काँग्रेसच्या (Congress) जागेत एक-एकने वाढ झाली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसनेही एक जागा जिंकली आहे. गेल्यावेळी पेक्षा यावेळी जागा कमी झाल्याने हा भाजपसाठी एक मोठा झटका असल्याचं बोललं जात आहे. कुठल्या पक्षाला किती जागा? एकूण जागा - 11 भाजप - 4 शिवसेना - 3 काँग्रेस - 3 राष्ट्रवादी - 3 गेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या नंदुरबार जिल्हा परिषदेत एकूण 7 जागा होत्या. मात्र, आता यावेळी त्यांच्या तीन जागा कमी झाल्या असून भाजपला 4 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. तर गेल्या निवडणुकीत शिवसेना आणि काँग्रेसने प्रत्येकी दोन-दोन जागांवर विजय मिळवला होता. त्यांनी आपल्या जागेत वाढ करुन प्रत्येकी तीन-तीन जागा जिंकल्या आहेत. यासोबतच गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे एकही जागा नव्हती त्यांनी या निवडणुकीत आपलं खातं उघडलं आहे. मुलगी विजयी तर पुतण्या पराभूत नंदुरबार जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप आमदार विजयकुमार गावित यांच्या मुलीने विजय मिळवला आहे. तर त्याचवेळी विजयकुमार गावित यांचा पुतण्या पंकज गावित याचा पराभव झाला आहे. या विजय आणि पराभवामुळे विजयकुमार गावित यांच्यासाठी एका डोळ्यात आसू अन् दुसऱ्यात हासू अशी परिस्थिती झाली आहे. विजयकुमार गावित यांचे पुतणे पंकज गावित यांना कोपरली गटातून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, तेथे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. सुप्रिया गावित यांची झेडपीत एन्ट्री सुप्रिया गावित या खासदार हिना गावित यांच्या बहीण आहेत. तर आमदार विजयकुमार गावित यांच्या सुप्रिया गावित या कन्या आहेत. सुप्रिया गावित यांनी शिवसेना उमेदवाराचा 1269 मतांनी पराभव केला आहे. विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक आपण लढवली होती आणि मतदारांनी आपल्या पदरात मते टाकली असल्याची प्रतिक्रिया सुप्रिया गावित यांनी दिली आहे. म्हसावद गटातून काँग्रेसच्या हेमलता शितोळे विजयी नंदुरबारमध्ये काँग्रेसने खाते उघडले असून म्हसावद गटातून काँग्रेसच्या हेमलता शितोळे विजयी झाल्या आहेत. हेमलता शितोळे यांनी भाजप उमेदवार शशिकांत पाटील यांचा पराभव केला आहे. हेमलता शितोळे यांनी 1923 मतांनी विजय मिळवला आहे. शहादा तालुक्यातील लोणखेडा गटातून भाजपाच्या जयश्री पाटील 4204 मतांनी विजयी

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या