निलेश पवार, प्रतिनिधी नंदुरबार, 6 ऑक्टोबर : नंदुरबार जिल्हा परिषद (Nandurbar Zilla Parishad) निवडणुकीत भाजप आमदार विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit) यांच्या मुलीने विजय मिळवला आहे. तर त्याचवेळी विजयकुमार गावित यांचा पुतण्या पंकज गावित याचा पराभव झाला आहे. या विजय आणि पराभवामुळे विजयकुमार गावित यांच्यासाठी एका डोळ्यात आसू अन् दुसऱ्यात हासू अशी परिस्थिती झाली आहे. विजयकुमार गावित यांचे पुतणे पंकज गावित (Pankaj Gavit) यांना कोपरली गटातून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, तेथे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. सुप्रिया गावित यांची झेडपीत एन्ट्री सुप्रिया गावित या खासदार हिना गावित यांच्या बहीण आहेत. तर आमदार विजयकुमार गावित यांच्या सुप्रिया गावित कन्या आहेत. सुप्रिया गावित यांनी शिवसेना उमेदवाराचा 1269 मतांनी पराभव केला आहे. विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक आपण लढवली होती आणि मतदारांनी आपल्या पदरात मते टाकली असल्याची प्रतिक्रिया सुप्रिया गावित यांनी दिली आहे. म्हसावद गटातून काँग्रेसच्या हेमलता शितोळे विजयी नंदुरबारमध्ये काँग्रेसने खाते उघडले असून म्हसावद गटातून काँग्रेसच्या हेमलता शितोळे विजयी झाल्या आहेत. हेमलता शितोळे यांनी भाजप उमेदवार शशिकांत पाटील यांचा पराभव केला आहे. हेमलता शितोळे यांनी 1923 मतांनी विजय मिळवला आहे. शहादा तालुक्यातील लोणखेडा गटातून भाजपाच्या जयश्री पाटील 4204 मतांनी विजयी अक्कलकुवा गटातुन काँग्रेस च्या मकरांनी सुरय्या बी अमीन विजयी काँग्रेसने खाते उघडले म्हसावद गटातून काँग्रेसच्या हेमलता शितोळे विजयी नंदुरबार जिल्हा परिषद निवडणूक जिल्हा परिषद 11 जागांसाठी तर 3 पंचायत समितीच्या 14 गटांच्या पोटनिवडणुका शिवसेना - 8 जागांवर उमेदवार - सर्व जागांवर ओबीसी उमेदवार भाजप - 11 जागाांवर उमेदवार - 8 ओबीसी तर 3 आदिवासी उमेदवार कॉंग्रेस - 5 जागांवर उमेदवार - 3 ओबीसी, 2 आदिवासी उमेदवार राष्ट्रवादी - 4 जागांवर उमेदवार - ओबीसी आणि SC प्रत्येकी 1, आदिवासी 2 उमेवार महाविकास आघाडी काही जागांवर एकत्र नंदुरबारमधील चुरशीच्या लढती खापर गट - नागेश पाडवी X गीता पाडवी कोपर्ली गट - राम रघुवंशी X पंकज गावित कोळदा गट - सुप्रिया गावित X आशा पवार धुळे जिल्हा परिषदेच्या 15 गट, पंचायत समितीच्या 30 जागांसाठी पोटनिवडणूक जिल्हा परिषद - 15 गट पंचायत समिती जागा - 30 जिल्हा परिषदेची 1 जागा बिनविरोध पंचायत समितीच्या 2 जागा बिनविरोध प्रमुख लढत - भाजप विरुद्ध महाविकास आघाडी 15 पैकी जिल्हा परिषदेची 1 जागा तर पंचायत समितीच्या 2 जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरित जिल्हा परिषदेच्या 14 आणि पंचायत समितीच्या 28 जागांसाठी पोटनिवडणूक पार पडली.