JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / संघ मुख्यालयावर मोर्च्यामुळे नागपूरमध्ये वातावरण तापले, वामन मेश्राम पोलिसांच्या ताब्यात

संघ मुख्यालयावर मोर्च्यामुळे नागपूरमध्ये वातावरण तापले, वामन मेश्राम पोलिसांच्या ताब्यात

आंदोलन करते आज मोर्चा काढण्यावर ठाम असल्याने पोलिसांनी आंदोलनकर्त्यांची शहरभर धरपकड सुरू केली.

जाहिरात

आंदोलन करते आज मोर्चा काढण्यावर ठाम असल्याने पोलिसांनी आंदोलनकर्त्यांची शहरभर धरपकड सुरू केली.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नागपूर, 06 ऑक्टोबर : नागपूरमध्ये संघ मुख्यालयावर मोर्चा काढल्या प्रकरणामुळे तणावपूर्ण वातावरण झाले आहे. मोर्चाला परवानगी नसतानाही भारत मुक्ती मोर्चा आंदोलनावर ठाम होते. पोलिसांनी अखेरीस वामन मेश्राम यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा आणि दीक्षाभूमी येथील धर्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा या पार्श्वभूमीवर पोलिसांवर ताण असल्याने 6 ऑक्टोबरला होणाऱ्या बेझनबाग ते संघ मुख्यालयावर निघणाऱ्या मोर्चाला पोलीस आणि न्यायालय यांनी परवानगी नाकारली होती. मात्र आंदोलन करते आज मोर्चा काढण्यावर ठाम असल्याने पोलिसांनी आंदोलनकर्त्यांची शहरभर धरपकड सुरू केली. ( नशेत तर्रर बाईच्या वेशात घरात खुसला अन् नागरिकांनी चोपला, मॉब लिंचिंगचा प्रकार ) वामन मेश्राम यांच्या नेतृत्वात भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने ही आंदोलन पुकारण्यात आले होते. मात्र परवानगी नसल्याने मोर्चा काढण्याच्या पवित्र्यात असणाऱ्या वामन मेश्राम यांना ताब्यात घेतले आहे. ( रावणरुपी प्रशासनाने रामाच्या सीतेचा बळी घेतला, जळगावात धक्कादायक घटना ) भारत मुक्ती मोर्चाचे वामन मेश्राम यांचे आरएसएस मुख्यालयावर मोर्चाचे प्रकरणी नागपूर पोलिसांची सकाळपासून कारवाई सुरू केली आहे. कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी इंदोरा आणि बेझनबाग येथे 144 कलम अंतर्गत जमावबंदी लावण्यात आले. 4 पेक्षा जास्त लोक एकत्र येऊ नये आणि प्रक्षोभक आवाहनाला जनतेने प्रतिसाद देऊ नये असे आदेश पोलिसांनी दिले होते. तसंच काही कार्यकर्त्यांना ताब्यातही घेतलं. शहरात वाढीव पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या