नागपूर 11 डिसेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नागपूरमध्ये समृद्धी महामार्गच्या पहिल्या टप्प्याचं आणि मेट्रो प्रकल्प, एम्सच्या लोकार्पणाचा सोहळा संपन्न झाला. यावेळी नागपुरमध्ये पंतप्रधानांनी ढोल वाजवण्याचा आनंद लुटला. PMO India च्या ट्विटर अकाऊंटवरुन ढोल वाजवतानाचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला दिलेल्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, ‘नागपुरमध्ये पारंपारिक स्वागत’. या व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदी ढोल वाद्याच्या पथकातील एका वादकाकडे असलेला ढोल वाजवताना दिसत आहेत. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर आनंदही झळकत आहे. पंतप्रधानांसोबतच पथकातील इतर तरुणही ढोल वाजवताना दिसतात. ‘तुम्ही नसता तर समृद्धी महामार्गाचं स्वप्न पूर्ण झालं नसतं’, फडणवीसांनी मानले मोदींचे आभार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नागपूरमध्ये समृद्धी महामार्गच्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी हिंदीतून भाषण केलं. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठीतून भाषणाला सुरुवात केली.
मुख्यमंत्री शिंदेंनी मानले आभार - माझ्यासाठी हा क्षण स्वप्नपूर्ती, अभिमान आणि गर्वाचा आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी हजर आहेत. याचा आम्हाला अभिमान आहे. फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते, त्यावेळी त्यांनी विश्वास दाखवला आणि आज महामार्ग उभारला आहे. या महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव दिलं त्याबद्दल समाधानी आहे, असं शिंदे म्हणाले. ‘तेव्हा तुमचा आशिर्वाद होता, पुढेही..’, मुख्यमंत्री शिंदेंची मोदींना खास विनंती फडणवीस काय म्हणाले - सोहळ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. फडणवीस म्हणाले, ‘समृद्धी महामार्गाचे काम सुरू केले तेव्हा माझ्यासोबत एकनाथ शिंदे होते. सर्व विरोधी पक्ष, पत्रकारांना विचारणा केली. आम्ही याची सुरुवात केली. भूमी अधिग्रहणाचा मुद्दा होता. त्यावेळी कुणीही पैसे द्यायला नव्हते. बँक पैसे द्यायला तयार नव्हते. महाराष्ट्र सरकारमध्ये काही अशी मुलं आहे, ज्यांच्याकडे खूप पैसे आहे, एमएमआरडीए आहे, सिडको आहे, आम्ही त्यांना सांगितलं मुंबईत पैसे कमावून मुंबईला लावू नका, विदर्भाला पैसे लावा असं सांगितलं आणि पैसे उधार घेऊन शेतकऱ्यांच्या जमिनीचे अधीग्रहण केलं, खुद्द एकनाथ शिंदे यांनी जाऊन शेतकऱ्यांच्या सह्या घेतल्या. कारण त्यावेळी ते ज्या पक्षात होते, त्यांचीच लोक गावामध्ये जाऊन विरोध करत होते. पण लोकांनी आम्हाला एक एक इंच जमीन दिली, असंही फडणवीस म्हणाले.