JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / "कोणी कितीही स्ट्रॅटेजी केली तरी 2024 मध्ये पुन्हा मोदी सरकारच" : देवेंद्र फडणवीस

"कोणी कितीही स्ट्रॅटेजी केली तरी 2024 मध्ये पुन्हा मोदी सरकारच" : देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis on Sharad Pawar - Prashant Kishor meeting: शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीवर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत मोठा दावा केला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नागपूर, 12 जून: शुक्रवारी महाराष्ट्रच नाही तर देशाच्या राजकारणात एक मोठी घडामोड झाली. ही घडामोड म्हणजे प्रख्यात राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या (NCP Chief Sharad Pawar) भेटीला पोहोचले. शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात झालेल्या बैठकीनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आहे. या भेटीवर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे. केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपच्या विरोधात इतर पक्षांनी एकत्र येण्यासाठी रणनीती आखण्यासाठी ही बैठक झाली असल्याची जोरदार चर्चा आहे. भाजप विरोधात आघाडी निर्माण करण्यासाठी स्ट्रॅटेजी तयार करण्यासाठी ही बैठक झाली असल्याचं बोललं जात असताना यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं, कोणी कोणाला भेटावं यासंदर्भात प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. मात्र कोणी कितीही स्ट्रॅटेजी तयार केली तरी 2024 च्या निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातच सरकार स्थापन होईल यात शंका नाही असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. बैठकीनंतर राष्ट्रवादीची प्रतिक्रिया शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात झालेल्या बैठकीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कोणतीही जबाबदारी राजकीय रणनीतीकार प्रशांत किसोर यांच्याकडे देण्यात आलेली नाहीये. प्रशांत किशोर हे राजकीय रणनीतीकार आहेत. त्यांचा वेगळा अनुभव आहे. तो अनुभव आणि देशात राजकीय परिस्थिती काय आहे याची माहिती प्रशांत किशोर यांनी शरद पवारांना दिली. देशातील सर्व विरोधी पक्षांची एकजूट व्हावी अशी इच्छा शरद पवारांची आहे आणि ती त्यांनी बोलून दाखवली आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकीपूर्वी शरद पवार बंगालमध्ये जाणार होते मात्र तब्येतीच्या कारणास्तव त्यांना जाता आले नाही असंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या