JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / अधिवेशनादरम्यान झालं आमदार आईचं दर्शन, राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे VIDEO

अधिवेशनादरम्यान झालं आमदार आईचं दर्शन, राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे VIDEO

आज अनोखे दृश्य विधानसभेच्या आवारात पाहायला मिळालं

जाहिरात

विधानसभा आवारातील दृश्य

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नागपूर, 18 डिसेंबर : राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आजपासून नागपूर येथे सुरू झाले आहे. याचदरम्यान, राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे या आपल्या लहान बाळाला घेऊन विधानसभेत दाखल झाल्या. आक्रमक असलेल्या विरोधकांपुढे राज्य सरकारची कसोटी लागणार आहे. महापुरुषांचा अपमान, महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद, राज्यातील उद्योगाची पळवापळवी यावर विरोधक आक्रमक झाले आहेत. राष्ट्रपुरुषांच्या अवमानावरून सरकारला घेरण्याचा इशारा विरोधकांनी दिला आहे. तसेच लोकायुक्त कायद्याचं बिलंही अधिवेशनात मांडलं जाणार आहे. त्यातच आज अनोखे दृश्य विधानसभेच्या आवारात पाहायला मिळालं आणि ते म्हणजे राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे या आपल्या लहान बाळाला घेऊन विधानसभेत दाखल दाखल झाल्या. या दृश्याच्या माध्यमातून एकीकडे लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी तर दुसरीकडे आई म्हणून जबाबदारी, अशा लोकप्रतिनिधी म्हणून त्या दिसल्या. राष्ट्रवादीच्या आमदार सरोज बाबुलाल अहिरे या 30 सप्टेंबरला आई झाल्या. यानंतर आज त्या हिवाळी अधिवेशनात सहभागी झाल्या आहेत. त्या म्हणाल्या, की मागील अडीच वर्षांपासून नागपुरात कोरोनामुळे एकही सत्र झाले नाही. मी आता आई आहे. पण मी माझ्या मतदारांच्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी आले आहे. आपल्या नवजात बाळाला घेऊन विधानसभेत पोहोचल्यावर अनेकांनी हे दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद केले.

संबंधित बातम्या

हेही वाचा -  अजितदादांनी मांडला कर्नाटक वादाचा मुद्दा, विधानसभा अध्यक्षांनी मध्येच अडवलं

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या