नागपूर, 30 सप्टेंबर : शारदीय नवरात्र उत्सवास घटस्थापनेपासून प्रारंभ झाला आहे. यंदा नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. मागील दोन वर्षांमध्ये कोविडचे सावट असल्यामुळे सार्वजनिक सण उत्सवावर निर्बंध होते. परंतु, आता हे सावट दूर झाल्याने भक्तांमध्ये उत्साह संचारला आहे. नागपुरातील पराडकर कुटुंबीयांनी कोल्हापूर येथील अंबाबाई मंदिराचा देखावा घरातच साकारला आहे. मंदिराचा हा नयनरम्य देखावा पाहण्यासाठी गर्दी होत आहे. कोल्हापूर येथील करवीर निवासीनी अंबाबाई साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे. याच मंदिराची हुबेहूब प्रतिकृती नागपुरातील पराडकर कुटुंबीयांनी घरात साकारली आहे. विशेषतः ही प्रतिकृती साकारताना पूर्णतः टाकाऊ वस्तूंचा वापर करण्यात आला आहे. घरातील दहा बाय पंधरा फुटाच्या हॉलमध्ये हा भव्य देखावा उभारण्यात आला आहे. सुबक आरास आणि उत्तम प्रकाशयोजनेमुळे हा देखावा पाहण्यासाठी गर्दी होत आहे. या वस्तूंपासून तयार केला देखावा पराडकर कुटुंब मागील चार वर्षापासून सातत्याने नावीन्यपूर्ण देखावे करत आले आहेत. गणपती विसर्जनानंतर रोहन पराडकरक आणि त्याचे कुटुंबीये नवरात्रीच्या तयारीला लागत असतात. हा देखावा साकार करण्यासाठी प्रामुख्याने कागदी खर्डा, कागद, रंग, कापड यांचा वापर करण्यात आला आहे.
शिक्षण सांभाळून जपली कला देवीची मूर्ती ही कागदी खरडा आणि वस्त्र यांच्या वापर करून तयार करण्यात आली आहे. रोहन आणि आर्यन पराडकर यांना सुरुवाती पासूनच या क्षेत्रात काम करायची आवड आहे. आपले शिक्षण सांभाळून त्यांनी ही उपजत कला जपली आहे. कला जपण्यासाठी पराडकर कुटुंबातील सर्वच रोहन आणि आर्यनला सहकार्य करतात. Navratri : पाचव्या दिवशी करा स्कंदमातेची प्रार्थना, पाहा पूजाविधी आणि महत्त्व!
यापूर्वीही साकारले भव्य देखावे
यापूर्वी नवरात्रीच्या देखाव्यासाठी काल्पनिक गुफा, चंद्रयान, इत्यादी आकर्षक देखावे तयार केले होते. पराडकर कुटुंबीयांच्या या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. देखावा पाहून साक्षात कोल्हापूर अंबाबाई देवी मंदिरात उभं असल्याची प्रचिती येत असल्याची भावना देखावा पाहण्यासाठी येणाऱ्या भक्तांनी व्यक्त केली. Video: सर्व मनोकामना पूर्ण करणारी अग्याराम देवी, 2706 अखंड ज्योतींनी उजळले मंदिर
भविष्यात देखील नावीन्यपूर्ण देखावे साकारणार
भविष्यात देखील हा उपक्रम असाच राबविण्यात येणार असून आम्हाला या कामातून आनंद मिळतो शिवाय उत्सव काळात घरातील वातावरण अतिशय प्रसन्न राहते, असे रोहन पराडकर यांनी सांगितले.