नागपूर, 30 सप्टेंबर : उपराजधानीची नवरदेवी म्हणून प्रख्यात असलेल्या अग्याराम देवी मंदिर हे नागपूरवासीयांचे श्रद्धास्थान आहे. तसेच या मंदिराला फार पुरातन इतिहास देखील आहे. शहरात शारदीय अश्विन नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर मंदिरात तब्बल 2 हजार 706 अखंड मनोकामना ज्योत प्रज्वलित करण्यात आल्या आहेत. मनोकामना ज्योत प्रज्वलित केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी लोकभावना आहे. शारदीय नवरात्र उत्सवास घटस्थापनेपासून प्रारंभ झाला आहे. यंदा नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. मागील दोन वर्षांमध्ये कोविडचे सावट असल्यामुळे सार्वजनिक सण उत्सवावर निर्बंध होते. परंतु, आता हे सावट दूर झाल्याने भक्तांमध्ये उत्साह संचारला आहे. मंदिर प्रशासनाच्या वतीने ज्योतीची देखभाल करण्यासाठी विशेष सोय करण्यात आली आहे. स्वयंसेवकामार्फत प्रज्वलित पूर्णवेळ ज्योतीवर लक्ष देण्यात येते आहे. मनोकामना ज्योत पाहण्यासाठी गर्दी अग्याराम देवीच्या चरणी लीन होऊन आस्थेने अखंड मनोकामना ज्योत प्रज्वलित केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी लोकभावना आहे. अखंड मनोकामना ज्योतीसाठी नवरात्री उत्सवाच्या आधी आपली नावे नोंदविण्यात येत असतात. ही मनोकामना ज्योत बघण्यासाठी नागपूरकर मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत.
मंदिराची दिनचर्या नवरात्रोत्सवात सकाळी 5 वाजल्या पासून ते रात्री 11 पर्यंत मंदिर भक्तांसाठी उघडे कण्यात येते. सकाळी सहाला आरती आणि रात्री साडेदहाला शयन आरती केली जाते. जय देवी जय देवी, जय महिषासुरमथनी । सुरवर-ईश्वर-वरदे, तारक संजीवनी जय देवी जय देवी ॥ त्रिभुवनी भुवनी पाहतां तुज ऎसे नाही, चारी श्रमले परंतु न बोलावे काहीं । साही विवाद करितां पडिले प्रवाही, ते तूं भक्तालागी पावसि लवलाही ॥ जय देवी जय देवी.. जय देवी जय देवी, जय महिषासुरमथनी । सुरवरईश्वरवरदे, तारक संजीवनी जय देवी जय देवी ॥ प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासां, क्लेशापासूनि सोडी तोडी भवपाशा । अंवे तुजवांचून कोण पुरविल आशा, नरहरि तल्लिन झाला पदपंकजलेशा ॥ जय देवी जय देवी.. जय देवी जय देवी, जय महिषासुरमथनी । सुरवरईश्वरवरदे, तारक संजीवनी जय देवी जय देवी ॥
पाचव्या दिवशी करा स्कंदमातेची प्रार्थना, पाहा पूजाविधी आणि महत्त्व!
सर्वांत पुरातन मंदिर नागपूरमधील सर्वांत पुरातन मंदिर असल्याने या मंदिरात पूर्वापार लोकांची गर्दी होते. मंदिरातील मूर्ती ही मंदिरामागील भागात खोदकाम करत असताना सापडली व नंतर त्याजागी देवीचे भव्य मंदिर उभारण्यात आले अशी आख्यायिका आहे. मंदिरातील प्रभावळ आणि देवीवरील दागिने हे चांदीचे असून त्यात देवी अतिशय विलोभनीय दिसते.
गुगल मॅपवरून साभार