प्रतिकात्मक फोटो
नागपूर, 16 जून : दारू विक्रीच्या वादातून एका 22 वर्षीय तरुणाची हत्या झाल्याचा प्रकार नागपुरातून (Nagpur) समोर आला आहे. मृतकाचे नाव चेतन अंकुश मोहर्ले असल्याची माहिती समोर आली आहे. मृतक चेतन आणि आरोपी हे दोघेही अवैध दारू विक्रीचा (illegal liquor trade) व्यवसाय करत होते. त्याच दारू विक्रीतून दोघांमध्ये जोरदार वाद झाला आणि वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. या प्रकरणात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हा 17 वर्षीय असून त्याच्या विरोधात यापूर्वी चोरी आणि मारहाणीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. मृतक चेतन याचा अवैध दारूचा धंदा होता आणि त्या ठिकाणी आरोपी हा नेहमी जात असे. काही दिवसांपूर्वी दोघांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर आरोपीने चेतनकडे जाणं बंद केलं होतं. मात्र, यामुळेच चेतन हा संतप्त झाला होता. (22 year old youth stabbed over an argument of illegal liquor trade in Nagpur) बुधवारी सायंकाळच्या सुमारास आरोपी आपल्या मित्रांसोबत बसला होता. त्यावेळी चेतन तेथे आला आणि ‘तू मेरा गेम करने वाला है, ऐसा सुना है’ असं म्हणत आरोपीसोबत वाद घालू लागला. त्यानंतर आरोपीने चेतनला समजावलं आणि तिथून निघून गेला. वाचा : आधी प्रेम विवाह मग मिस्ड कॉलमुळे दुसरं लग्न अन् आता सोशल मीडिया मित्रासोबत पळून गेली त्यानंतर रात्री 8 वाजण्याच्या सुमारास चेतन आपल्या दोन-तीन मित्रांसोबत आरोपीच्या घरी दाखल झाला. यावेळी तेथे त्यांच्यात पुन्हा वाद झाला. या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. यावेळी अल्पवयीन असलेल्या आरोपीने आपल्या घरातून धारदार चाकू आणला आणि चेतनच्या पोटावर वार केला. या हल्ल्यात चेतन गंभीर जखमी झाला आणि तो रस्त्यावर कोसळला. यानंतर चेतनच्या मित्रांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. मात्र, उपचारादरम्यान चेतनचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. सांगलीत प्रेयसी मागितली सोन्याची अंगठी, प्रियकराने गळा आवळला प्रेयसी आपल्या प्रियकराने हट्टाने काही ना काही मागत असते आणि प्रेयसीला ते आणून देण्यासाठी प्रियकर जीवाची आटापिटा करतो. पण, सोन्याची अंगठी मागितली म्हणून एका प्रियकराने प्रेयसीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणी कडेगाव पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.