गेल्या आठवड्यात महाराष्ट्रात यांच्या राम कथेचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यांच्या याच कार्यक्रमातील दिव्य दरबारवर
नागपूर, 25 जानेवारी : मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील बागेश्वर धामचे महाराज पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून चांगलाच वाद पेटला आहे. एवढंच नाहीतर बागेश्वर धाम महाराजाला जीवे मारण्याच्या धमक्या सुद्धा मिळत आहे. पण आता बागेश्वर धामचे महंत पंडित धीरेंद्र कृष्ण यांना नागपूर पोलिसांची क्लीन चिट दिली आहे. गेल्या आठवड्यात महाराष्ट्रात यांच्या राम कथेचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यांच्या याच कार्यक्रमातील दिव्य दरबारवर अंनिसकडून आक्षेप घेतला गेला. त्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहे. या प्रकरणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दाखल केलेला अर्ज नागपूर पोलिसांकडून दप्तरी दाखल केला होता. (‘चमत्कार करणाऱ्यांनी जोशीमठ..’ अंनिसनंतर आता थेट शंकराचार्यांचे धीरेंद्र शास्त्रींना आव्हान) नागपूर पोलिसांनी धीरेंद्र कृष्ण यांचे व्हिडिओ तपासले असता त्यामध्ये अंधश्रद्धा पसरविण्याविरोधात काहीही बोलले नसल्याचा निष्कर्ष काढला आहे. काय होता अंनिसचा आक्षेप श्याम मानव म्हणाले, “9 जानेवारीला आम्ही पत्रकार परिषद घेऊन धीरेंद्र महाराज दिव्य दरबारात जे दावे करतात त्याला आव्हान दिलं. हे महाराज दावा करतात की, ते भक्तांचं नाव आपोआप ओळखतात, भक्तांच्या वडिलांचं नाव आपोआप ओळखतात. एवढंच नव्हे तर त्यांचं वय आणि मोबाईल नंबरही सांगतात. याशिवाय धीरेंद्र महाराज कोणत्याही भक्ताच्या घरातील कोणत्या खोलीत, कोणत्या कपाटात कोणती वस्तू ठेवली हेही सांगण्याचा दावा करतात. या दाव्यातील पहिल्या भागाला टेलिपथी आणि इंट्युशन म्हणतात. तसेच घरात जाऊन काहीही पाहू शकण्याच्या क्षमतेला अंतर्ज्ञान किंवा दिव्यशक्ती (क्लेरोयान्स) म्हणतात. मी दैवीशक्तीला कोणतंही आव्हान दिलं नाही, तर महाराजांच्या दिव्यशक्तीला आव्हान दिलं आहे,” अशी माहिती श्याम मानव यांनी दिली. शास्त्री यांनी जीवे मारण्याची धमकी दरम्यान, जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर बागेश्वर धामचे सरकार पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. शास्त्री म्हणाले की, ते सनातन धर्माचे अनुयायी आहेत. सनातन धर्माचे अनुयायी अशा धमक्यांना घाबरत नाहीत. चमत्कारावरुन वादात सापडलेले धीरेंद्र कृष्ण शास्त्री पहिल्यांदाच बागेश्वर धाम येथे पोहचले. वाचा - ‘सनातन धर्माचे लोक..’ जीवे मारण्याच्या धमकीनंतर धीरेंद्र शास्त्री आक्रमक; म्हणाले.. धीरेंद्र शास्त्री यांनी पाकिस्तानबाबत वक्तव्य केले. ते म्हणाले की, जो देश इतरांना नष्ट करण्यात आपली शक्ती खर्च करतो तो देश नष्ट होतो. पाकिस्तानचे भारतात लवकरच विलीनीकरण झाले पाहिजे, त्यांच्याकडे हाच मार्ग शिल्लक आहे.’ याआधीही बागेश्वर धामच्या महाराजांना फोनवरून धमक्या दिल्याची बातमी आली होती. याबाबत छतरपूर पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. धमक्यांची तक्रार धीरेंद्र शास्त्री यांचे नातेवाईक लोकेश गर्ग यांनी पोलिसांत दाखल केली आहे. या प्रकरणी बामिठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर या प्रकरणाचा तपास सुरू असून आरोपींचा शोध सुरू आहे.