JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / आदित्य ठाकरेंच्या कार्यक्रमासाठी वीज चोरी; VIDEO समोर येताच महावितरणाने केली कारवाई

आदित्य ठाकरेंच्या कार्यक्रमासाठी वीज चोरी; VIDEO समोर येताच महावितरणाने केली कारवाई

आदित्य (Aaditya Thackeray) यांच्या नागपूर दौऱ्यानिमित्त नवीन सुभेदार येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी वीज चोरी झाल्याचा प्रकार पुढे आला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नागपूर 29 ऑगस्ट : शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या नागपूर दौऱ्यात एक विचित्र प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. आदित्य यांच्या नागपूर दौऱ्यानिमित्त नवीन सुभेदार येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी वीज चोरी झाल्याचा प्रकार पुढे आला आहे. या वीज चोरीची व्हिडिओ क्लिप सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. ‘ते कधी चुकीचं वागू शकत नाही’; किशोरी पेडणेकरांनी केलं मुख्यमंत्र्यांचं कौतुक, दुसऱ्याच क्षणी म्हणाल्या.. स्थानिक नेते दीपक कापसे यांनी आदित्य ठाकरे यांना तान्या पोळ्यानिमित्त नागपूरला बोलावले होते. त्या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर आयोजित कार्यक्रमासाठी लागणारी वीज ही चोरीच्या मार्गाने घेतल्याचं पुढे आलं आहे. याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. यात विजेच्या दोन खांबा दरम्यानच्या तारांवर आकोडे टाकून वीज घेण्यात आल्याचं दिसून येतं.

संबंधित बातम्या

महावितरणला याबाबत माहिती मिळतात मंडप डेकोरेशन कंत्राटदार मनोहर बनते यांच्यावर कारवाई करत आठ हजाराचा दंड ठोठावण्यात आला आहे. काही महिन्यांपूर्वीच नागपुरातील गजानन नगर परिसरात शिवसेना नेते संजय राऊत यांच्या सभेच्या वेळीही असाच प्रकार घडला होता. तेव्हाही सभेसाठी जवळच्या खांबावरून वीज चोरल्याचं उघड झालं होतं. त्यानंतर महावितरणने आयोजकांना दंडही ठोठावला होता. रोहित पवार अडचणीत येणार? गुलाबराव पाटलांचं वादग्रस्त विधान, काँग्रेसला अध्यक्ष मिळणार TOP बातम्या नेमकं काय घडलं - नागपुरातील या कार्यक्रमाला शनिवारी आदित्य ठाकरे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी व्यासपीठामागील विजेच्या खांबावरून वीज चोरी करण्यात आली होती. याचा व्हिडिओ प्रसारित झाला. ज्यात विजेच्या दोन खांबा दरम्यानच्या तारांवर आकोडे टाकून वीज घेण्यात आल्याचे दिसून आले. यानंतर महावितरणाने याप्रकरणी कंत्राटदारावर कारवाई केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या