फाईल फोटो
नागपूर 28 ऑगस्ट : मध्यप्रदेशातील पांढुर्णा आणि सावरगाव इथे पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे करीला गोटमार म्हणजे दगडफेक करण्याची जीवघेणी परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे. याचनिमित्ताने एकमेकांवर तुफान दगडफेक करणारे लोक यंदाही महाराष्ट्र मध्यप्रदेश सीमेवरील पांढुर्णा येथे दिसले. याला गोटमार यात्रा असं म्हटलं जातं. या गोटमारीत 300 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. लाथ लागल्याने धावत्या ट्रेनमधून खाली फेकलं; तरुणाचा मृत्यू, नागपूर-पुणे गरीबरथमधील घटना या दगडफेकीत चार जण गंभीर जखमी झाले असून जखमींना नागपूरात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. दोन्ही बाजूला झालेल्या गोटमारीत अनेक जणांना अपंगत्व आलं आहे. नदी पात्रातील झेंडा उचलण्यासाठी ही स्पर्धा असते. या स्पर्धेत पांढुर्णा गावातील लोकांनी झेंडा उचलला आहे. एका प्रेमी युगुलाला विरोध म्हणून जाम नदीच्या दोन्ही काठांवर असलेल्या गावकर्यांमध्ये दगडफेक झाली. त्याचं स्मरण म्हणून ही धोंडाफेक केली जाते, अशी एक आख्यायिका सांगितली जाते. तर जुन्या काळात पेंढारी लोकांना शह देण्याकरिता गावकर्यांनी केलेल्या गोटमाराची आठवण यानिमित्ताने जागवली जात असल्याचंही सांगितलं जातं. तेव्हापासून इथे पोळ्याच्या दुसर्या दिवशी ही ऐतिहासिक गोटमार करण्याचा येथील नागरिकांचा प्रघात आहे. गर्लफ्रेंडला फिरण्यासाठी हवी होती नवीन मॉडेलची दुचाकी, नागपुरातील प्रियकरानं तब्बल… गोटमार परंपरा वर्षानुवर्षे पाळली जात आहे. गोटमार दरम्यान एकमेकांवर दगडफेक करण्याचा हा खेळ थांबवण्यासाठी प्रशासनाने अनेक प्रयत्न केले, मात्र आतापर्यंत प्रत्येक प्रयत्न फसला आहे. दगडांचा पाऊस थांबवण्यासाठी रबर बॉलने खेळ आयोजित करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र हा प्रयत्न काही मिनिटांतच उधळला गेला. गेल्या चार वर्षांपासून गोटमार बंद करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले, हे प्रकरण मानवी हक्क आयोगापर्यंत पोहोचले. गोटमार यात्रेचा उपक्रम रोखण्यासाठी प्रशासनाची कडक तयारी होती, मात्र गोटमार परंपरा थांबवण्याचे प्रयत्न फसले.