नागपूर, 14 जानेवारी : भारतात हजारो रेल्वे क्रॉसिंग आहेत. रेल्वेमधून प्रवास करताना तुम्ही एक रेल्वे ट्रॅक दुसऱ्या ट्रॅकला जोडताना आणि एक ट्रॅक दुसऱ्या ट्रॅकला क्रॉस करताना पाहिलं असेल; पण भारतात एक असं ठिकाण आहे, जिथे एकाच ठिकाणी चार ट्रॅक एकमेकांना क्रॉस करतात. महाराष्ट्रात नागपूरमध्ये हे क्रॉसिंग आहे. संपूर्ण भारतात फक्त याच ठिकाणी अशा प्रकारचं क्रॉसिंग असून, त्याला डायमंड क्रॉसिंग म्हणतात. तिथे तुम्ही उभे राहिलात, तर तुम्हाला चारही दिशांना रेल्वे ट्रॅक दिसतात. अर्थातच चारही बाजूंनी रेल्वेगाड्या येताना दिसतात. विशेष म्हणजे नागपूरमधलं हे डायमंड क्रॉसिंग पाहण्यासाठी अनेक पर्यटक येतात. डायमंड क्रॉसिंग 24 तास खुलं असतं; मात्र तिथे नागरिकांना जास्त काळ थांबण्याची परवानगी नाही. सुरक्षेच्या दृष्टीने रेल्वे ट्रॅकजवळ उभं राहणं योग्य नाही. रेल्वे प्रशासन या ठिकाणी फार वेळ कोणालाही उभं राहू देत नाही; पण असं ठिकाण भारतात एकमेव असल्यामुळे हे डायमंड क्रॉसिंग पाहण्यासाठी देशाच्या विविध भागातून पर्यटक येतात. सर्व दिशांनी येतात रेल्वेगाड्या डायमंड क्रॉसिंगवर चारही दिशांनी येणाऱ्या ट्रॅकवर वेगवेगळ्या रेल्वेगाड्यांचे मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. पूर्वेला गोंदियापासून एक रेल्वे ट्रॅक येतो. हा ट्रॅक हावडा-रूरकेला-रायपूर ट्रॅक म्हणून ओळखला जातो. दक्षिणेकडून एक ट्रॅक येतो. दिल्लीहून येणाऱ्या गाड्या उत्तर दिशेच्या ट्रॅकवरून येतात. या ठिकाणी पश्चिमेकडून म्हणजेच मुंबईकडून येणारा रेल्वे ट्रॅकही आहे. एकाच वेळी दोन रेल्वे क्रॉस होऊ शकत नसल्यानं डायमंड क्रॉसिंगवरून जाणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या वेळा वेगवेगळ्या आहेत. रेल्वेची टाइम मॅनेजमेंट यंत्रणा इतकी मजबूत आहे की, येथे कोणताही अपघात न होता डायमंड क्रॉसिंगवरून गाड्या सुरळीतपणे जातात. रेल्वेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकानं पाहायलाच पाहिजे असं ठिकाण, Video डायमंड क्रॉसिंग म्हणजे काय? काही रेल्वे ट्रॅक हे एकाच रेल्वे लाइनवर असतात आणि ते ट्रॅक एकाच दिशेनं एकमेकांना क्रॉस करतात. डायमंड क्रॉसिंगमध्ये चार ट्रॅक क्रॉस चिन्हासारखे एकमेकांना क्रॉसिंग करतात. नागपूरच्या डायमंड क्रॉसिंगमध्ये 4 रेल्वे ट्रॅक आहेत. ते एकमेकांना क्रॉस करीत असल्यानं, हा परिसर रस्त्यावरच्या एखाद्या चौकासारखा दिसतो. रेल्वे स्टेशनचं नाव पिवळ्या रंगाच्या बोर्डवर का लिहिलं जातं? संपूर्ण जगातलं सर्वांत मोठं रेल्वेचं जाळं भारतात आहे. कुठेही जाण्याचं सर्वांत स्वस्त आणि वेगवान साधन म्हणून अनेकजण रेल्वेनं प्रवास करण्यास प्राधान्य देतात. भारतीय रेल्वेची अनेक वैशिष्ट्यं आहेत. त्यापैकीच एक म्हणजे डायमंड ट्रॅक म्हणता येईल.