JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / winter session : "मला धमकी आली तेव्हा सरकारने...." नाव न घेता मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंवर निशाणा

winter session : "मला धमकी आली तेव्हा सरकारने...." नाव न घेता मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंवर निशाणा

गडचिरोलीतील नक्षलवाद नावापुरता राहिला आहे. तोही संपवू, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नागपूर, 19 डिसेंबर : राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आजपासून नागपूर येथे सुरू झाले आहे. यावेळी सभागृहात माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, सुरजा गड येथील प्रकल्पात 4 हजार लोकांना रोजगार मिळाला आहे. पण हा प्रकल्प बंद पाडण्याच्या हालचाली नक्षलवाद्यांनी सुरुवात केली आहे. दरम्यान, सकाळी नक्षलवाद्यांची धमकीचं एक पत्रक आले होते. या संपूर्ण प्रकरणावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सुरजागड येथे देवीचे स्थान आहे. तेथे अजिबात मायनिंग करणार नाही. जूनपर्यंत पहिला फेज सुरू होणार आहे. 20 कोटी रुपये त्याठिकाणी गुंतवणूक करणार आहोत. तिथली जनता ही त्याला मान्यता देते आहे. त्या प्रकल्पांना विशेष रस्ता देणार आहोत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, गडचिरोलीतील वस्तूस्थिती वेगळी आहे. उपमुख्यमंत्र्यांनी जी माहिती दिली ती तपासले पाहिजे. तेथे रस्ते अजिबात नाहीयेत. त्या प्रकल्पामुळे नक्षलवाद्यांना ताकद मिळते आहे. या प्रकरणाला तेवढे महत्व देऊ नका. तिथे रेल्वे गेली पाहिजे होती, असेही नाना पटोले म्हणाले. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नक्षलवाद्यांना घाबरुन कधीच महाराष्ट्र थांबणार नाही. त्यांना उत्तर देवू. गडचिरोलीतील नक्षलवाद नावापुरता राहिला आहे. तोही संपवू, असेही ते म्हणाले. तसेच नक्षलात भरती करायला बाहेरील राज्यातून तरुण आणले जात आहेत. जर कुणाला ताब्यात घेतले असेल तर त्याला आम्ही सोडवू, असेही ते म्हणाले. हेही वाचा -  अजितदादांनी मांडला कर्नाटक वादाचा मुद्दा, विधानसभा अध्यक्षांनी मध्येच अडवलं दरम्यान, यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, सुरजागड प्रकल्प पुर्ण केला नाही तर महाराष्ट्र नक्षलवाद्यांसमोर झुकल्यासारखे होईल. त्यामुळे तो प्रकल्प पुर्ण करणारच. पण मला ज्यावेळेस आधी धमकी आली होती तेव्हा सरकारने Z+ सुरक्षा नाकारली होती, असा धक्कादायक खुलासाही त्यांनी केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या