नागपूर, 19 डिसेंबर : राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून नागपूरमध्ये सुरूवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नागपुरात भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातले भाजपचे सगळेच बडे नेते उपस्थित होते. भाजपच्या या बैठकीत अब की बार 150 पारच्या घोषणा देण्यात आल्या आहेत. मुख्य म्हणजे कालच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पुढचा मुख्यमंत्री करण्याचं सूचक विधान बावनकुळे यांनी केलं होतं, त्यानंतर आता भाजपकडून 150 पारचा नारा दिला जात आहे. बावनकुळेंचं स्पष्टीकरण दुसरीकडे चंद्रशेखर बावनकुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पुढचा मुख्यमंत्री करण्याच्या विधानावर स्पष्टीकरण दिलं आहे. ‘देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्यांनी प्रत्येक जाती समुहाला मदत केली होती. फडणवीस मुख्यमंत्री असताना सर्व स्तरातील लोकांसाठी त्यांनी काम केलं आहे, पण देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 2019 ला संख्याबळ असताना आमच्यासोबत बेईमानी झाली. मी व्यक्त केलेल्या भावना नागरिकांच्या होत्या,’ असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
भाजप नेत्यांसमोरच फडणवीसांची ‘मन की बात’, पुढच्या अडीच वर्षांचं कटू सत्य सांगितलं! आजच मुख्यमंत्री व्हावेत, असं नाही पण माझा कार्यकाळ असेपर्यंत व्हावेत, अशी इच्छाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली. तसंच एकनाथ शिंदे लढवत असलेल्या प्रत्येक उमेदवाराला भाजप पूर्णपणे मदत करणार आहे. भाजप एकहाती ताकद जरी वाढवत असली तरीही भाजप एकनाथ शिंदे यांना मदत करणार आहे, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं. देवेंद्र फडणवीसांच्या भाजप आमदारांनाच कानपिचक्या, जाहीर कार्यक्रमात यादीच वाचून दाखवली आज दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपचं मिशन सांगितलं. विदर्भामध्ये पुढच्या वेळी 11 खासदार आणि 50 पेक्षा जास्त आमदार निवडून आणणार, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत. तसंच निवडून येणारे हे लोकप्रतिनिधी शिंदे आणि फडणवीस यांचे असतील, असंही बावनकुळे म्हणाले.