JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मोठी दुर्घटना! नागपूरच्या 30 महिलांना देवदर्शनासाठी घेऊन निघालेल्या बसचा भीषण अपघात

मोठी दुर्घटना! नागपूरच्या 30 महिलांना देवदर्शनासाठी घेऊन निघालेल्या बसचा भीषण अपघात

हिंगणी-सेलू मार्गावर पेंढरी घाटात हा अपघात झाला. या खासगी बसमध्ये 30 महिला प्रवासी होत्या. या सर्व महिला देवदर्शनासाठी निघाल्या होत्या. (Road Accident in Nagpur)

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नागपूर 16 सप्टेंबर : नागपुरमधून एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. यात देवदर्शनासाठी महिलांना घेऊन जाणाऱ्या खाजगी बसला अपघात झाला आहे. चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेत बस खड्ड्यात पलटली असून घटनेत दहा महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. Video : शिक्षणासाठी जीव धोक्यात, मुलांना कडेवर घेऊन नदीतून करावा लागतो प्रवास मिळालेल्या माहितीनुसार, हिंगणी-सेलू मार्गावर पेंढरी घाटात हा अपघात झाला. या खासगी बसमध्ये 30 महिला प्रवासी होत्या. या सर्व महिला देवदर्शनासाठी निघाल्या होत्या. मात्र, वाटतेच या बसचा भीषण अपघात झाला.या अपघातात 30 पैकी दहा महिला गंभीर जखमी झाल्या आहे. यातील बहुतांश महिला या नागपूरच्या त्रिमूर्ती आणि प्रताप नगर भागातील आहेत. एसटी बसच्या पत्र्याचा धक्का लागला अन्..; पोलीस भरतीसाठी व्यायाम करताना 2 तरुणांसोबत भयंकर दुर्घटना पेणमधील अपघातात एकाचा मृत्यू - पेणमधील वाशी नाक्यावरही एक अपघाताची घटना समोर आली आहे. यात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. रात्रभर मुसळधार पावसामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते, रस्त्यावर वाहनं चालवताना समोरचं काहीच दिसत नसल्याची स्थिती आहे. सकाळी घरातून JSW कंपनीत कामासाठी निघालेल्या या व्यक्तीचा 11 च्या सुमारास वाशी नाक्यावर अपघात झाला. त्यामुळे काही काळ वाहतूक कोंडीही झाली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या