JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सरसंघचालकांचा भाजप-सेनेला सल्ला!

सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सरसंघचालकांचा भाजप-सेनेला सल्ला!

भाजप-सेना यांच्यात सुरु असलेला संघर्ष थांबवण्यासाठी आता सरसंघचालक मोहन भागवत यांनी त्यांच्या भाषणातून अप्रत्यक्ष सल्ला दिला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नागपूर, 19 नोव्हेंबर : राज्यातील सत्ता स्थापनेचा पेच अद्याप सुटलेला नाही. भाजप-सेना यांच्यात सुरु असलेला संघर्ष थांबवण्यासाठी आता सरसंघचालक मोहन भागवत यांनी त्यांच्या भाषणातून अप्रत्यक्ष सल्ला दिला आहे. नागपूरमध्ये एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी सांगितले की, लहान मुलांचे प्रथम गुरू त्यांचे आई-वडील असतात. शाळेत जाण्यापूर्वी त्यांना प्राथमिक शिक्षण घरातूनच मिळतं. राज्यात सध्या भाजप शिवसेना यांच्यात मुख्यमंत्रिपदावरून बिनसलं आहे. त्यामुळे युतीने एकत्र निवडणुका लढल्यानंतर बहुमत मिळूनही भाजप-सेनेला सरकार स्थापन करता आलं नाही. अखेर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर मोहन भागवत यांनी म्हटलं की, सर्वांना माहिती आहे आपआपसांत वाद केल्यानं दोघांचही नुकसान होत आहे. मात्र कोणीही वाद सोडण्यासा तयार नाही. स्वार्थामुळे नुकसान होतं मात्र तो सोडायला कोणी तयार नसतं. हे तत्व सर्वांना लागू आहे. मग तो व्यक्ती असो किंवा देश. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे गेले होते. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष महाआघाडीच्या माध्यमातून निवडणूक रिंगणात होते. निवडणुकीत जनतेनं कोणत्याही एका पक्षाला कल दिला नसला तरीही भाजप-सेना युतीला स्पष्ट बहुमत दिलं होतं. मात्र मुख्यमंत्रिपदावरून या दोन पक्षांत संघर्ष निर्माण झाल्यानंतर ही युती तुटली. महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रितपणे सरकार स्थापन करणार अशी चर्चा सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संभाव्य महाशिवआघाडीच्या गोटात खळबळ उडवून दिली. राज्यसभेत बोलताना पंतप्रधानांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं कौतुक करून जणू नव्या समीकरणांची पायाभरणी केली. राज्यात सत्तास्थापन्याची मॅच जिंकण्यासाठी जोरदार राजकीय टोलेबाजी सुरू असतानाच शरद पवारांनी टाकलेल्या गुगलीमुळे नवं सरकार स्थापनेआधीच क्लिनबोल्ड झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यातच नरेंद्र मोदींनी राज्यसभेत सिक्सर लगाऊन मॅच रोमांचक वळणावर आणून ठेवली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या