JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मुंब्रा पोलिसांची धडक कारवाई, 16 लाखांच्या MD पावडर जप्त, नायजेरियन व्यक्तीसह एकाला अटक

मुंब्रा पोलिसांची धडक कारवाई, 16 लाखांच्या MD पावडर जप्त, नायजेरियन व्यक्तीसह एकाला अटक

मुंब्रा पोलिसांनी (Mumbra police) धडक कारवाई केली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

ठाणे, 22 नोव्हेंबर: मुंब्रा पोलिसांनी (Mumbra police) धडक कारवाई केली आहे. 16 लाखांच्या एमडी पावडरसह (MD Powder) दोन जणांना अटक केल्याची माहिती समोर आली आहे. सध्या ड्रग्सचा धंदा करणाऱ्याविरोधात मुंब्रा पोलिसांनी चांगलीच मोहीम उघडली आहे. पोलिसांना दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून 210 ग्रॅम एमडी नावाचा अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आला आहे. या एमडीची बाजारात तब्बल 16 लाख एवढी किंमत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक गीताराम शेवाळे यांनी दिली. अशी केली कारवाई 19 नोव्हेंबर रोजी एन.डी.पी.एस पथकातील PSI काळे यांना सूत्रानं माहिती दिली. या गुप्त माहितीच्या आधारे मुंब्रा बायपास रोडवर सापळा रचून गोडविन इमानियल इफेनजी या 41 वर्षीय नायजेरियन नागरिकाला अटक केली. हेही वाचा-   बांगलादेशनं केलेल्या पराभवामुळे पाकिस्तान अडचणीत, टीमसमोर वर्ल्ड कपमधून बाहेर जाण्याचं संकट त्याच्या अंगझडतीत पाच लाख रुपये किंमतीची 100 ग्रॅम एमडी पावडर सापडली. दुसरी अंमली पदार्थाची कारवाई 20 नोव्हेंबर रोजी करण्यात आली. ज्यात पोलीस पथकाला खडी मशिन रोड, साहिल हॉटेलच्या मागे, मुंबा बायपास रोड एक इसम मोफेडीन (एम.डी.) पावडरसह विक्री करण्यासाठी येत आहे अशी माहिती मिळाली. हेही वाचा-   लय भारी! माकडाचं Hulla hooping; कमरेभोवती कशी गरागरा फिरवली रिंग पाहा VIDEO पोलीस निरीक्षक गीताराम शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने सापळा रचून आरोपी नदीम मेहबुब खान याला जेरबंद केलं. त्याच्याकडून 10 लाख रुपयांची 110 ग्रॅम मोफेड्रोन एमडी पावडर हस्तगत केली. दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी ठोठावण्यात आली असून सदर अंमली पदार्थ त्यांनी कुठून मिळवले आणि ते कोणाला विकणार होते याचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या