JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / World Vada Pav Day 2022: जागतिक वडापाव दिन, अशा प्रकारे बटाटावडा बनला मुंबईची शान

World Vada Pav Day 2022: जागतिक वडापाव दिन, अशा प्रकारे बटाटावडा बनला मुंबईची शान

वडापाव सर्वसामान्यांचा आवडता पदार्थ आहे. वडापाव खाणाऱ्या शौकिनांची संख्या कमी नाही. विशेषत: मुंबई आणि वडापावचं समीकरण घट्ट आहे. अनेक मुंबईकरांसाठी नाश्ता, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण हे तिन्ही टाईम जेवण म्हणजे फक्त वडा पाव…

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 23 ऑगस्ट : काहींना आश्चर्य वाटेल मात्र जागतिक वडा पाव दिवसही असतो आणि तो आज 23 ऑगस्टला साजरा केला जातो. वडापाव सर्वसामान्यांचा आवडता पदार्थ आहे. वडापाव खाणाऱ्या शौकिनांची संख्या कमी नाही. विशेषत: मुंबई आणि वडापावचं समीकरण घट्ट आहे. अनेक मुंबईकरांसाठी नाश्ता, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण हे तिन्ही टाईम जेवण म्हणजे फक्त वडा पाव असा प्रकार आहे. मुंबईत येऊन कोणी वडापाव खात नाही, असं होऊ शकत नाही. लेटेस्टली ने दिलेल्या माहितीनुसार वडापाव सुरू झाला तेव्हा तो 10 पैशांना विकला गेला. आज तो 10 ते 80 रुपये, 100 रुपयांनाही मिळतो. मुंबईत दादर, परळ, गिरगाव इत्यादी ठिकाणी मराठी रेस्टॉरंट्सची संख्या वाढल्यानंतर बटाटावड्याला मुंबईत घर मिळाले. पण सुरुवातीच्या काळात फक्त बटाटावडा खाल्ला जायचा. पावसोबत कधी खाल्ला यावर मतमतांतरे आहेत. दादर आणि इतर भागातील गिरणी कामगारांनी हा मौल्यवान मराठी खाद्यपदार्थ स्वीकारला. 23 ऑगस्ट 2001 रोजी, धीरज गुप्ता यांनी वडापावचे भारतीय बर्गरमध्ये रूपांतर करून जंबो वडापाव फूड चेन सुरू केली. त्यामुळे 9 शहरांमध्ये त्यांच्या शाखा सध्या जागतिक वडापाव दिन साजरा करतात. इतरांनीही त्याचे अनुकरण सुरू केले आहे. वडापाव हे खरे तर सर्वसामान्यांचे खाद्य आहे. मुंबईतील गिरणी कामगारांच्या संस्कृतीत ते लवकर रुजले. ते खाण्यासाठी प्लेट किंवा चमच्याची गरज नाही. जितक्या लवकर बनवले जाते तितक्या लवकर खाल्ले जाते. त्यामुळेच तो धावणाऱ्या मुंबईची कार्यसंस्कृती म्हणून ओळखला जाऊ लागला. आज मुंबईत दररोज 18 ते 20 लाख वडापाव विकले जातात, अशी माहिती आहे. वडापाव कधी सुरू झाला - वडापावचा जन्म 1966 मध्ये दादर स्थानकाच्या बाहेर अशोक वैद्य यांच्या फूड ट्रकमध्ये झाल्याचे मानले जाते. याच काळात दादरमध्ये सुधाकर म्हात्रे यांचा वडापावही सुरू झाल्याचे जुने मुंबईकर सांगतात. बटाट्याची भाजी आणि पोळी खाण्याऐवजी त्यांनी बेसनमध्ये बटाटा भाजी तळून वडा बनवायला सुरुवात केली. World Vadapav Day : पुण्यातील 50 वर्ष जुना गार्डनचा वडापाव, आजही आहे खवय्यांची पहिली पसंती रोजगाराचे साधन आणि राजकीय पाठबळ - 1970 ते 1980 च्या दशकात मुंबईतील गिरण्या बंद पडू लागल्याने अनेक तरुणांनी वडापावकडे उपजीविकेचे साधन म्हणून पाहिले. मग हळूहळू प्रत्येक रस्त्यावर आणि चौकाचौकात वडापावची वाहने दिसू लागली. मराठी मुलांच्या या लढ्याला शिवसेनेने पाठिंबा दिला. मराठी माणसाने इंडस्ट्रीत यावे, असे बाळासाहेब ठाकरे यांचे नेहमीच मत होते. त्यामुळे वडापावच्या गाड्यांचा छोटा धंदा सुरू झाला. त्याचवेळी शिवसेनेने दक्षिण भारतीयांच्या विरोधात भूमिका घेतल्याने शिवसेनेने मुंबईतील दादर, माटुंगा यांसारख्या भागातील उडपी हॉटेल्समध्ये दाक्षिणात्य खाद्यपदार्थांचा निषेध करण्यासाठी वडा पावाचा प्रचार सुरू केला. शिवसेनेने वडा पावाला राजकीय पातळीवर ब्रँड केले आणि अशा शिव वडापावचा जन्म झाला. महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने काही नियम करून वडापावला राजकीय पाठबळ दिले. आज अनेक कार्यालयांच्या कॅन्टीनमध्ये, शाळांच्या कॅन्टीनमध्ये वडापावांना कायमस्वरूपी जागा मिळाली आहे. World Vada Pav Day: वडापाव विकून उभारली 50 कोटींची कंपनी, कल्याणमध्ये सुरू झालेल्या कंपनीची देशभर आहेत 350 आउटलेट्स परदेशातही वडापावचा दबदबा- मुंबईच्या रिझवी कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांनी 15 ऑगस्ट 2010 रोजी लंडनमध्ये वडापाव हॉटेल सुरू केले. ठाण्यातील सुजय सोहनी आणि वडाळ्यातील सुबोध जोशी यांनी मिळून हे हॉटेल सुरू केले. श्री कृष्णा वडापाव नावाच्या हॉटेल व्यवसायातून ते वर्षाला 4 कोटींहून अधिक कमावतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या