JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मरण पत्करू पण शरण जाणार नाही.. उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले..

मरण पत्करू पण शरण जाणार नाही.. उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले..

महाविकास आघाडीतील मित्रपक्षांची आज बैठक पार पडली. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली आगामी दिशा स्पष्ट केली.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 23 ऑगस्ट : शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर महाविकास आघाडीत धुसफूस सुरू झाली होती. त्यामुळे आगामी काळात आघाडी तुटणार असल्याची शक्यताही निर्माण झाली होती. या सर्व पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीतील मित्र पक्षाची बैठक झाली. यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपली भूमिका मांडली. कोरोना सारख्या मोठ्या संकटात माघार घेतली नाही, त्यापुढे हे संकट काहीच नसल्याचे सांगत ठाकरेंनी आपले इरादे स्पष्ट केलेत. त्यावर ठरणार देशात लोकशाही की बेबंदशाही : उद्धव ठाकरे अजित पवार यांचे आभार मानतो गेल्या अडीच वर्षात आर्थिक गाडा त्यांनी सांभाळला. कोविड काळातही आर्थिक गाडा व्यवस्थित हाताळला आहे. माझ्या लोकांवर मी विश्वास टाकला, त्याचा त्यांनी गैरफायदा घेतला. केंद्र आणि राज्य सरकारची तुलना करायची झाली तर ती इंग्रजांशीच करावी लागेल. इंग्रजांप्रमाणे अत्याचारी सरकार असल्याचा गंभीर आरोप ठाकरेंनी केला. हा जो निकाल लागणार आहे तो या देशात लोकशाही राहणार की बेबंदशाही रहाणार याचा हा निकाल आहे. यावेळी सत्ता गेली तरी आपण एकत्र आहेत यांचे कौतुक असल्याचेही ते म्हणाले.

वाचा -  गद्दारी ते बंद खोलीतील बैठक.. राज ठाकरे यांच्या भाषणातील 5 मोठे ‘प्रहार’

संबंधित बातम्या

ठाकरे यांच्याकडून अजित पवारांचे कौतुक जगभरात संकट होतं तेव्हा आपल्याला सत्ता मिळाली आणि आता कोरोना गेल्यावर यांनी सत्ता हिस्कावली. पण आपल्याला संघर्ष करायचा आहे. संघर्षाला आपण मागे हटणार नाही. मी फार काळ अधिवेशनात उपस्थित राहत नाही. कारण इथलं गांभीर्य राहिलेलं नाही. सदनाची परंपरा रसातळाला गेली आहे. मागच्या अडीच वर्षात अजित पवार यांनी आर्थिक गाडा ज्या पद्धतीने सांभाळला त्याचं कौतुक आहे. जर कोरोना काळात जीव वाचवणयासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. तरी आम्ही कामं केली नाही, असं जर म्हणत असेल तर त्याला अर्थ नाही. मरण पत्करू पण शरण जाणार नाही : ठाकरे हे सरकार खोके सरकार आहे. हे सरकार पाच वर्ष चालले असते. हे सरकार स्थापन होताना मला सांगायचे की काँग्रेस - राष्ट्रवादी दगा फटका करेल. पण मला हे सांगायला लाज वाटते की आमच्याच लोकांनी दगाफटका केला. यांना आम्ही खूप सन्मान दिला पण यांनी आमचा घात केला. 15 आमदारांनाही अनेक ऑफर आल्या. पण, ते माझ्या सोबत राहिले याचा मला अभिमान आहे. मरण पत्करू पण शरण जाणार नाही, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. अनेक वर्षे राजकारण केले, पाहिले. पण वैयक्तिक संबंध कधी बिगडू दिले नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या