JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / उद्धव ठाकरेंची मोठी खेळी, मुख्यमंत्री शिंदेंच्या खास आमदाराला देणार शह?

उद्धव ठाकरेंची मोठी खेळी, मुख्यमंत्री शिंदेंच्या खास आमदाराला देणार शह?

नुकतीच स्नेहल जगताप यांनी मातोश्री येथे येऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे

जाहिरात

उद्धव ठाकरेंची मोठी खेळी, मुख्यमंत्री शिंदेंच्या खास आमदाराला देणार शह?

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 22 ऑक्टोबर : शिवसेनेमध्ये बंडखोरी करून 40 आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहे. पण, आता शिवसेनेनं या गटात गेलेल्या एक एक आमदारांचा हिशेब करण्याची तयारी सुरू केली आहे. शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांना शह देण्यासाठी शिवसेनेकडून माजी आमदार माणिक जगताप यांची कन्या स्नेहल जगताप यांना संधी देणार असल्याची शक्यता आहे. शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांना त्यांच्याच मतदार संघात आव्हान निर्माण करण्यासाठी आता ठाकरे गटाकडून एक नवी रणनीती आखण्यात येत आहे. काँग्रेसच्या महाड नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा आणि माजी आमदार माणिक जगताप यांची कन्या स्नेहल जगताप या ठाकरे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे.

नुकतीच स्नेहल जगताप यांनी मातोश्री येथे येऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. स्नेहल जगताप यांचे वडील माणिक जगताप यांचा पराभव करूनच भरत गोगावले हे महाडचे आमदार झाले होते. त्यामुळे आता भरत गोगावले यांचा पराभव करण्यासाठी माणिक जगताप यांच्याच कन्येला ठाकरे गट संधी देणार का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागला आहे. (‘पुणे बदलतंय की पुणे तरंगतंय’, शिवसेनेनं उडवली भाजपची खिल्ली) स्वर्गीय माणिक जगताप यांनी 1 टर्म आमदार म्हणून काम केल्यानंतर भरत गोगावले यांनी त्यांचा पराभव केला आणि महाड विधानसभा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेतला. भरत गोगावले मागील 3 टर्म महाड विधानसभेचे प्रतिनिधित्व करतात. परंतु, शिवसेनेत दोन गट निर्माण झाल्यानंतर ठाकरे गट हा विधानसभा मतदार संघ ताब्यात घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं पाहायला मिळत आहे. (Supriya Sule : ‘आमच्या कामाचे श्रेय घेऊ नका त्यावर…’ अजित दादांची सही सुप्रिया सुळेंचा रोख कोणावर?) यासाठीच शिवसेनेत दोन गट निर्माण झाल्यानंतर स्नेहल जगताप यांना ‘मातोश्री’वर येण्यासाठी चार ते पाच वेळा निमंत्रण देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आगामी काळात भरत गोगावले यांना शिवसेना कशा प्रकारे शह देणार हे पाहण्याचं ठरणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या