JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / लपंडाव खेळणाऱ्या मुलीचा वेदनादायक मृत्यू, खिडकीतून पाहताच वरुन आली लिफ्ट आणि...

लपंडाव खेळणाऱ्या मुलीचा वेदनादायक मृत्यू, खिडकीतून पाहताच वरुन आली लिफ्ट आणि...

मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे मानखुर्द परिसरात लपंडाव खेळत असलेल्या लिफ्ट पडली असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.

जाहिरात

व्हायरल बातमी

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 2 नोव्हेंबर : मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे मानखुर्द परिसरात लपंडाव खेळत असलेल्या मुलीच्या डोक्यावर लिफ्ट पडली, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे. ही बातमी ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १६ वर्षीय रेश्मा खरवी ही मानखुर्द येथील सोसायटीत राहणाऱ्या आजीच्या घरी गेली होती. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे आणि पुढील कारवाई सुरू आहे. शुक्रवार 28 ऑक्टोबरची ही घटना आहे. ही मुलगी सोसायटीतच आपल्या मैत्रिणींसोबत लपंडाव खेळत होती. गेममध्ये जेव्हा रेश्माला सगळ्यांना शोधायचं होतं, तेव्हा तिने थेट लिफ्टमध्ये उघडणाऱ्या खिडकीतून डोकावले. त्यावेळीच लिफ्ट वरून आल्याने रेश्माच्या डोक्यावर लिफ्ट पडली आहे. या अपघातात रेश्माचा दुर्दैवी मृत्यू झाला. हे ही वाचा : ट्रकपाहून अचानक युटर्न… स्कूटी चालवणाऱ्या तरुणीच्या अजब ड्रायविंगचा Video Viral लिफ्टच्या खिडकीत काच का लावली नाही? या प्रकरणानंतर रेश्माच्या कुटुंबीयांनी सोसायटीचा कारभार पाहणाऱ्या अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. अपघात टाळण्यासाठी गृहनिर्माण संस्थेच्या अधिकाऱ्यांनी खिडकीला काच लावायला हवी होती, असे रेश्माचे वडील रवी खरवी यांनी सांगितले. याप्रकरणी कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार केली आहे. पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे आणि या प्रकरणी दोन लोकांना अटक देखील केली आहे. याप्रकरणी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष आणि सचिव यांना अटक करण्यात आली असून, त्यांची चौकशी सुरू असल्याचे मानखुर्द पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महादेव कोळी यांनी सांगितले. मृत रेश्माचे कुटुंब मुंबईतील साठे नगर येथे राहते.

तिची आजी मानखुर्द येथील हाउसिंग सोसायटीच्या पाचव्या मजल्यावर राहते. रेश्मा दिवाळी साजरी करण्यासाठी येथे आली होती मात्र ती दुर्दैवी अपघाताची बळी ठरली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या