JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Ambadas Danve Shiv Sena : ‘अब्दुल सत्तार कुत्रादेखील प्रमाणिक असतो तुम्ही तर गद्दार आहात’ अंबादास दानवेंचा घाणाघात

Ambadas Danve Shiv Sena : ‘अब्दुल सत्तार कुत्रादेखील प्रमाणिक असतो तुम्ही तर गद्दार आहात’ अंबादास दानवेंचा घाणाघात

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे कोणत्याही मंचावर गेल्यास पहिल्यांदा बंडखोर आमदारांचा समाचार घेतात ते लोणावळ्यात आज बोलताना बंडखोर आमदारांचा चांगलाच समाचार घेतला.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लोणावळा, 28 सप्टेंबर : मागच्या दोन महिन्यांपूर्वी शिवसेनेतील 40 आमदारांनी बंडखोरी करत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. यानंतर शिवसेनेतील आमदारांनी बंडखोर आमदारांवर जोरदार टीका करण्यास सुरू केले. मागच्या दोन महिन्यांपासून शिवसेना आणि शिंदे गटातील आमदारांमध्ये शाब्दिक वाद सुरू आहे. यामध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे कोणत्याही मंचावर गेल्यास पहिल्यांदा बंडखोर आमदारांचा समाचार घेतात ते लोणावळ्यात आज बोलताना बंडखोर आमदारांचा चांगलाच समाचार घेतला. अडचणीच्या काळात जो शिवसेनेसोबत आहे तोच खरा शिवसैनिक, असे कार्यकर्त्यांशी बोलताना अंबादास दानवे म्हणाले.

लोणावळ्यात मंगळवारी अंबादास दानवे यांनी लोणावळा शिवसेना संपर्क कार्यालयाला भेट देत शिवसैनिकांशी संवाद साधला. या वेळी शिवसेना माजी पुणे जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे, लोणावळा शहरप्रमुख बाळासाहेब फाटक, उपजिल्हाप्रमुख भारत ठाकूर, गटनेत्या शादान चौधरी, तालुका उपप्रमुख आशिष ठोंबरे, सुरेश गायकवाड, शांताराम भोते आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.

हे ही वाचा :  शिवाजी पार्क झालं आता भगवानगडाच्या दसरा मेळाव्यावरून संघर्ष

संबंधित बातम्या

ते पुढे म्हणाले कि, आपल्या नेतृत्वावर विश्वास ठेवा. पक्षचिन्ह कोणाला मिळणार, या विषयात तुम्ही पडू नका. बाळासाहेबांचे विचार व उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवा. शिवसेना कोणाची आहे हे जगाला माहिती आहे. शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची आहे. खरी शिवसेना ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाची आहे, असे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केले.

जाहिरात

अंबादास दानवे म्हणाले, की ज्यांना गल्लीतील कुत्रंदेखील विचारत नव्हतं, त्यांना शिवसेनेनं मोठं केलं. काल अब्दुल सत्तार म्हणाले, मला कुत्रा चिन्ह दिलं तरी मी निवडून येईल. यावर दानवे म्हणाले, की कुत्रादेखील प्रामाणिक असतो, तुम्ही गद्दार आहात. जनता तुम्हाला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही.

शिवसेना चाळीस गद्दारांची नाही तर कडवट शिवसैनिकांची आहे. न्यायालयाचा निकाल येऊ द्या, मग बघू; असे काही जण म्हणत आहेत; पण काय व्हायचं ते होऊ दे आपण बाळासाहेबांच्या विचारांसोबत रहायचे. चिन्ह, निशाणी या विषयात जाऊ नका.

जाहिरात

हे ही वाचा :  महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची पुढची तारीख, सरकारच्या भवितव्याचा फैसला होणार?

अडचणीच्या काळात जो शिवसेनेसोबत आहे तोच खरा शिवसैनिक, असे कार्यकर्त्यांशी बोलताना अंबादास दानवे म्हणाले, की आपल्या नेतृत्वावर विश्वास ठेवा. पक्षचिन्ह कोणाला मिळणार, या विषयात तुम्ही पडू नका. बाळासाहेबांचे विचार व उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवा. शिवसेना कोणाची आहे हे जगाला माहिती आहे. शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची आहे.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या