JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / आता युवासेनेला खिंडार पडणार? सहसचिव शर्मिला येवलेंसह 35 पदाधिकारी बाहेर पडणार

आता युवासेनेला खिंडार पडणार? सहसचिव शर्मिला येवलेंसह 35 पदाधिकारी बाहेर पडणार

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला युवा सेना पदाधिकारी धक्का देण्याच्या तयारीत आहेत.

जाहिरात

सहसचिव शर्मिला येवलेंसह 35 पदाधिकारी बाहेर पडणार

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 18 नोव्हेंबर : शिवसेनेमध्ये दोन गट पडले असल्याने नेत्यांसबोत अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्येही फूट पडल्याचे पाहायला मिळत आहे. आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा दोन्ही गटाकडून केला जात असला, तरी अद्याप त्याबाबत अधिकृत निर्णय झालेला नाही. यादरम्यान दोन्ही गटांमध्ये पक्षप्रवेश सुरु असून आपली बाजू भक्कम असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यातच आता ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला युवा सेना पदाधिकारी धक्का देण्याच्या तयारीत आहेत. युवा सेना सहसचिव शर्मिला येवले पदाधिकाऱ्यासह बाहेर पडणार युवा सेना सहसचिव शर्मिला येवले यांच्यासह 35 पदाधिकारी युवा सेनेतून बाहेर पडणार आहे. शर्मिला येवले आणि इतर 35 पदाधिकारी उद्या आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती आहे. पक्षात संधी दिली जात नसल्याचा आरोप करत राजीनामा देणार आहे. उद्या सकाळी पत्रकार परिषद घेऊन राजीनाम्याची घोषणा करणार आहे. त्यामुळे आता ठाकरे गटाला आणखी एक धक्का पचवावा लागणार आहे. दरम्यान, काही दिवसांपासून अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी देखील त्या शिंदे गटात सहभागी होणार असल्याचं सूचक विधान केलं होतं. वाचा - ‘मी शिवबंधन एका मिनिटात सोडणार पण अट एकच’…. दीपाली सय्यद बाहेर पडणार? राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आणि त्याआधीही दीपाली सय्यद प्रचंड सक्रीय झाल्याचं चित्र दिसत होतं. अनकेदा त्यांनी विरोधकांवर जाहीरपणे टीका केली असून, सडेतोड उत्तरही दिलं. ठाकरे आणि शिंदे एकत्र येण्यासाठीही त्या प्रयत्न करत होत्या. पण पक्षात सुषमा अंधारे यांचा प्रवेश झाल्यापासून दीपाली सय्यद फारशा सक्रीय झालेल्या दिसत नाहीत. याचं नेमकं कारण विचारण्यात आलं असता त्यांनी ‘मी स्क्रीनवर येऊन तू-तू मै-मै करत नाही. जेव्हा गरज होती तेव्हा मी केली,” असं सांगितलं.

तुम्ही सध्या शांत का आहात? असं विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की “सुषमाताई नुकत्याच आल्या असून त्यांना आपण शिवसेनेत आल्याचं आणि आपलं अस्तित्व सिद्ध करायचं आहे. शिवसेनेत काम करताना मला आता साडेतीन वर्षं झाली आहेत. स्क्रीनवर येऊन टिप्पणी केली, कुरघोड्या केल्या तरच तुम्ही राजकारणात सक्रीय आहात असा समज करण्याची गरज नाही. मी कामंही केली पाहिजेत. जी लोक कामं करतात त्यांना पाठिंबा दिला तरच ती पूर्ण होतात”. “दोघे एकत्र यावेत अशी माझी इच्छा होती आणि त्यासाठी मी वाट पाहत होते. एकत्र आले तर आपलं बळ वाढेल असं मला वाटत होतं. कार्यकर्त्यांवर या गोष्टीचा फार परिणाम होत आहे. जे कार्यकर्त्यांसोबत काम करतात त्यांनाच हे जाणवतं,” असंही त्यांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या