शिवसेनेची धगधगती मशाल सुषमा अंधारे कोण आहे?

सुषमा अंधारे या शिवसेनेच्या उपनेत्या आहेत. 

28 जुलै 2022 रोजी म्हणजेच तीन महिन्यांपूर्वीच त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

लातूर जिल्ह्यातील मुरूड गावच्या असलेल्या सुषमा अंधारे यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1984 रोजी झाला.

लातूर येथील 'रुरल एज्यूकेशन फाऊंडेशन'च्या शाळेत त्यांचं बारावीपर्यंतच शिक्षण झालं.

त्यानंतर बसवेश्वर कॉलेजमध्ये राज्यशास्त्र विषयातून एमएची पदवी, त्यानंतर बीएड केलं.

सुषमा अंधारे भटक्या विमुक्त समाजातील आहेत. 

उच्च शिक्षण घेत असताना राज्य पातळीवरील अनेक प्रतिष्ठित वक्तृत्व स्पर्धा त्यांनी जिंकल्या आहेत.

शिवसेनेत येण्यापूर्वी सुषमा अंधारे गणराज्य संघात काम करत होत्या. 

राज्यघटनेत नागरिकांना दिलेल्या मूलभूत हक्कांची जाणीव खेड्यापाड्यातील लोकांना व्हावी यासाठी त्या काम करत होत्या.