JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Palghar Police : अखेर बेपत्ता मुलीचा शोध लागला; वडिलांनी माहिती न देता पोलिसांनी शोधले

Palghar Police : अखेर बेपत्ता मुलीचा शोध लागला; वडिलांनी माहिती न देता पोलिसांनी शोधले

पालघरमध्ये मागच्या काही दिवसांपूर्वी दोन मुली बेपत्ता होत्या यामध्ये दुसऱ्या बेपत्ता मुलीला शोधण्यात जव्हार पोलिसांना यश आले आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पालघर, विजय राऊत (1 ऑक्टोंबर) : पालघरमध्ये मागच्या काही दिवसांपूर्वी दोन मुली बेपत्ता होत्या यामध्ये दुसऱ्या बेपत्ता मुलीला शोधण्यात जव्हार पोलिसांना यश आले आहे. अल्पवयीन मुलगी काळू ही नाशिक येथील उंटवाडी रोडवरील शिशुविहार आधार आश्रम येथे 1 सप्टेंबर 2022 पासून  सुस्थितीत असल्याची पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. आदिवासी मजुराची पिळवणूक तसेच अल्पवयीन मुलींना कामावर ठेवल्याप्रकरणी जव्हार पोलीस ठाण्यात वेठबिगार ऊच्चाटन आणि बालमजुर कायदान्वये नरेश भोये याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्या अनुषंगाने जव्हार पोलिसांनी तपास कार्य सुरू केले होते.

येवला येथे एक अल्पवयीन मुलगी बकऱ्या चारत असताना काही नागरिकांना निदर्शनास आली, त्यांनी तात्काळ त्या मुलीला येवला येथील पोलीस ठाण्यात दाखल करून तिच्या बाबत चौकशी केली, परंतु कोणत्याही प्रकारे पालकांचा तपास लागला नाही, म्हणून मुलीला नाशिक येथील शिशुविहार आधार आश्रम नाशिक उंटवाडी येथे ठेवण्यात आले. काही दिवसांनी येवला पोलीस ठाणे येथून नरेश भोये यांना तिची मुलगी काळू हिला नाशिकच्या आधार आश्रम येथे ठेवण्यात आले असल्याचे कळविले होते.

हे ही वाचा :  अवघ्या 11 सेकंदात पत्त्यांसारखी कोसळली 3 मजली इमारत, 2 महिला जखमी, चंद्रपुरातील VIDEO

संबंधित बातम्या

परंतु ही बाब नरेश भोये यांनी जव्हार पोलीस ठाण्यात कळविली नव्हती, अखेर जव्हार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अहिरराव यांनी नगर जिल्ह्यातील कांदडकर यांची चौकशी केली असता या मुलीचा शोध लावणे सोपे झाले असल्याचे सांगितले. आश्रम मधील अटीनुसार काळूचे पुरावे अगर शासकीय कागदपत्र सादर करून ही मुलगी आई वडिलांच्या स्वाधीन करण्यात येईल असी माहिती पोलीस निरीक्षक आप्पासाहेब लेंगरे यांनी दिली आहे.

जाहिरात

मुले चोरणारी म्हणून महिलेला मारहाण

सोशल मीडियावर सध्या मुलं पळवणाऱ्या टोळी संबंधित चुकीच्या अफवा पसरवल्या जात आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. विशेष म्हणजे काही ठिकाणी मुलं पळवणाऱ्या टोळीच्या संशयातून निष्पाप नागरिकांवर हल्ला झाल्याचा देखील प्रकार समोर आला आहे.

हे ही वाचा :  विषारी सापासोबत खेळ करणं जीवावर बेतलं; वर्ध्यातील युवकाचा मृत्यू, थरकाप उडवणारा VIDEO

जाहिरात

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरातही अशीच काहीशी घटना समोर आली आहे. मुलं पळवण्याच्या संशयातून एका निष्पाप महिलेला चाळीसगाव शहरात काही नागरिकांनी मारहाण केलं आहे. पीडित महिलेला मारहाण करतानाचे व्हिडीओ देखील समोर आले असून ते व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या