आता महाराष्ट्रात आता दोन मोठे प्रकल्प येणार आहेत. पुण्यात 1 हजार 600 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे.
मुंबई, 31 ऑक्टोबर : महाराष्ट्रातून एकापाठोपाठ 5 प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे विरोधकांनी शिंदे सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. अखेर ड्रमेंज कंट्रोल करण्यासाठी शिंदे सरकारने धावाधाव सुरू आहे. आता महाराष्ट्रात आता दोन मोठे प्रकल्प येणार आहेत. पुण्यात 1 हजार 600 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. गेल्या दोन महिन्यांपासून महाराष्ट्रात 2 प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते. काही दिवसांपूर्वी दिल्लीतील अधिकारी पुण्यात येऊन गेले होते. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा सुद्धा केली होती. त्यानंतर आज आयटी मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी दिल्लीत घोषणा केली आहे. ( खुशखबर! वीजबिलाचं टेन्शन नाही, शेतकऱ्यांसाठी सरकारनं आणलीय ही योजना ) इलेकट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर आणि CDAC या दोन कंपनी पुण्यात गुंतवणूक करणार आहेतस अशी घोषमा केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी दिल्लीत केली आहे. ( ‘पंतप्रधान मोदी हे देशाचं, त्यामुळे…‘प्रकल्पांबद्दल राज ठाकरे स्पष्टच बोलले ) या योजनेतंर्गत दोन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक तर पाच हजार रोजगार निर्मितीचा दावा करण्यात येत आहे. इलेकट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर ही कंपनी 600 कोटींची गुंतवणूक करणार आहे. तर CDAC ही कंपनी 1 हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. त्यामुळे एकूण 1 हजार 600 कोटी रुपयांची गुंतवणूक या दोन कंपनी पुण्यात करणार आहेत. महाराष्ट्रासाठी दोन प्रकल्पांची घोषणा पुण्यात 1 हजार 600 कोटी रुपयांची गुंतवणूक इलेकट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर कंपनी - 600 कोटी गुंतवणूक CDAC कंपनी 1 हजार कोटी गुंतवणूक - महाराष्ट्राला इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर मंजूर - राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स धोरणातंर्गत महाराष्ट्राला मोदींची गिफ्ट - 2000 कोटींची गुंतवणूक येणार, 5000 रोजगार निर्मिती - 297.11 एकर जागेवर हे क्लस्टर साकारणार - 492.85 कोटी रुपये एकूण खर्च केले जाणार - 207.98 कोटी रुपये हे केंद्र सरकार महाराष्ट्राला देणार - आयएफबी रेफ्रिजरेशनचे काम सुरु, 450 कोटींची या एकट्या कंपनीची गुंतवणूक - इंडस्ट्रीयल इलेक्ट्रॉनिक्स, कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स, सोलार पीव्ही मॅन्युफॅक्चरिंग, ई मोबिलिटी उत्पादक असे अनेक उद्योग येणार