प्रमोद पाटील (नवी मुंबई), 03 नोव्हेंबर : मुंबईत प्रदुषणामुळे मृत माशांच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. नवी मुंबईतील एलिफंटा बेटावर असाच एक प्रकार समोर आला आहे. एलिफंटा बेटाच्या शेतबंदर जेट्टीच्या बाजूला एक महाकाय 35 फूट लांब आणि 9 टन वजनाचा महाकाय व्हेलमासा मृतावस्थेत आढळला आहे. दरम्यान या माशाची विल्हेवाट कशी लावायची हा प्रश्न अधिकाऱ्यांसमोर होता. शेवटी दोन बोटींच्या आधारे या माशाला हलवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी माहिती दिली.
एलिफंटा बेटावरील शेतबंदर जेट्टीच्या बाजूला समुद्राच्या लाटांनी वाहत आलेला सुमारे 35 फूट लांबीचा आणि जवळपास 9 टन वजनाचा महाकाय व्हेलमासा मृत अवस्थेत आढळला. या माशाची विल्हेवाट लावायची म्हणजे मोठे जिकरीचे काम होते, कोणतीही साधन सामुग्री नसल्याने या महाकाय माशाची विल्हेवाट लावायची कशी असा प्रश्न विभागाचे अधिकाऱ्यांना पडला होता.
हे ही वाचा : यंदा नोव्हेंबरमध्ये थंडी देणार दांडी, पाऊस पुन्हा थैमान घालणार?
माशाचे वजनच इतके होते की त्याला ओढायला दोन बोटी लागल्या. मात्र या महाकाय माशाला दफन ही करता येत नसल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून याचा निर्णय घेतला जाणार असल्याचा वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
भाईंदर किनाऱ्यावरही असाच प्रकार
भाईंदरमधील मच्छिमार lobster (शिवंड) बोट समुद्रात जात असतात. दरम्यान काही मच्छीमार किनाऱ्यापासून अर्ध्या तासाच्या अंतरावर जावून मच्छिमारी करत असतात. दरम्यान काल दुर्मीळ असा मासा मच्छीमारांना सापडल्याने याची जोरदार चर्चा रंगली होती. मच्छीमारांना वाघ्या पाकट मासा मिळाल्याने त्याचा बोलबाला सुरू होता. वाघ्या पाकट मासा हा क्वचित मिळणारा मासा असून त्याचे वजन 100 किलो होते आणि तो मासा 5 हजाराला विकला गेला असल्याचे मच्छीमार अजित पाटील यांनी सांगितले.
शिरूर तालुक्यात बिबट्यांची दहशत
शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे ऊस तोडणी सुरु असताना बिबट्याचे अंदाजे दहा दिवसांचे 4 लहान बछडे आढळून आले. परिणामी या परिसरात बिबटे असल्याची धास्ती घेऊन नागरिकांमध्ये भीतीचे निर्माण झाले आहे.
हे ही वाचा : पाऊस, ऊन आणि वादळ सर्वात आधी तुम्हाला मिळेल अलर्ट; असे व्हा हवामान शास्त्रज्ञ
शेतकरी बाळासाहेब पांडुरंग दरेकर यांच्या शेतात ऊस तोडणी सुरु होती. ऊस तोडणी सुरु असताना ऊसाच्या सरीमध्ये बिबट्याचे लहान 4 बछडे निदर्शनास आले.