JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Milind Narvekar : MCA निवडणुकीत उद्धव ठाकरे का आले नाही? मिलिंद नार्वेकर म्हणाले...

Milind Narvekar : MCA निवडणुकीत उद्धव ठाकरे का आले नाही? मिलिंद नार्वेकर म्हणाले...

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जाणारे मिलींद नार्वेकर मुंबई क्रिकेट असोसीएशनमध्ये निवडून आल्यावर माध्यमांना प्रतिक्रीया दिली.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 21 ऑक्टोबर : मुंबई क्रिकेट असोसिएशनची नुकतीच निवडणूक प्रक्रीया पार पडली. या निवडणुकीत खासदार शरद पवार आणि भाजप नेते आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली पॅनेल राहिले होते. तर दुसरीकडे माजी क्रिकेटपट्टू संदीप पाटील यांच्या नेतृत्वात एक पॅनेल उभा राहिले होते. या निवडणूकीत पवार- शेलार यांच्या पॅनेलने बाजी मारत एमसीएवर सत्ता स्थापन केली. या पॅनेलमध्ये शिवसेना पक्ष प्रमुख यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जाणारे मिलींद नार्वेकर यांचाही समावेश होता. ते निवडून आल्यावर माध्यमांना प्रतिक्रीया दिली.

मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) निवडणूक प्रक्रीयेत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांनी अनुपस्थिती दर्शवल्याने यावरून जोरदार चर्चा रंगली होती. कार्यकारिणी परिषद सदस्यपदी उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर हे सर्वाधिक गुणांनी निवडून आले. दरम्यान त्यांची एमसीएच्या कार्यकारी सदस्यपदी निवड करण्यात आली. या निवडणूक प्रक्रियेत त्यांना 221 मते मिळाल्याने त्यांनी या निवडणूकीत सर्वाधिक मते मिळवली आहेत. नार्वेकर पहिल्यांदाच एमसीएच्या कार्यकारणीमध्ये सहभागी होणार आहेत.

हे ही वाचा :  दिवाळीपूर्वी शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, आयपीएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

संबंधित बातम्या

विजयानंतर मिलिंद नार्वेकरांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या निवडणुकीच्या मतदानासाठी न आल्यासंदर्भात प्रतिक्रिया दिली ते म्हणाले कि, ते नाही आले तरी हरकत नाही. उमेदवारी दिली म्हणून 221 पर्यंत पोहोचलेलो आहे हे फार महत्त्वाचं आहे,  शिवसेनेतील फूट आणि शिंदे गट बाहेर पडल्यानंतरची ही पहिली निवडणूक असल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या.

जाहिरात

राजकीय आखाड्यामध्ये एकमेकांविरोधात लढणारे क्रिकेटच्या मैदानात एकमेकांना खांदा लावून लढत आहेत अशी सर्वसामान्यांकडून टीका होत आहे यावर काय सांगाल? असा प्रश्न पत्रकाराने नार्वेकरांना विचारला. यावर नार्वेकरांनी, या सगळ्याचे उत्तर पवारसाहेबच देतील म्हणत त्यांनी बोलण्याचे टाळले. निवडून आल्यानंतर ‘मुंबई तक’ला नार्वेकरांनी विशेष मुलाखत दिली. यावेळी ते बोलत होते.

हे ही वाचा :  MCA Election : ‘एमसीए’च्या सामन्यात तीनही ठाकरे ‘खेळाडू’, पण मैदानातच उतरले नाहीत!

जाहिरात

सर्वपक्षीय नेते एकत्र मात्र ठाकरेंची अनुपस्थीती

एमसीए निवडणुकीच्या आदल्या दिवशी पवार-शेलार पॅनलचे सगळे नेते एकत्र आले होते. शरद पवारांनी या पॅनलसाठी डिनर डिप्लोमसीचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला शरद पवारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, मिलिंद नार्वेकर, जितेंद्र आव्हाड, प्रताप सरनाईक सहभागी झाले होते. या नेत्यांनी पवार-शेलार पॅनलला विजयी करण्याचं आवाहन केलं होतं.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या