JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / SRA घोटाळा प्रकरणी किशोरी पेडणेकरांच्या अडचणीत वाढ, किरीट सोमय्यांनी केला नवा दावा

SRA घोटाळा प्रकरणी किशोरी पेडणेकरांच्या अडचणीत वाढ, किरीट सोमय्यांनी केला नवा दावा

एसआरएमध्ये फ्लॅट देण्याच्या नावाखाली झालेल्या फसवणुकीत जून महिन्यात दादार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता

जाहिरात

एसआरएमध्ये फ्लॅट देण्याच्या नावाखाली झालेल्या फसवणुकीत जून महिन्यात दादार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 29 ऑक्टोबर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्यानंतर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर अडचणीत सापडल्या आहेत. शुक्रवारी दादर पोलीस स्थानकात किशोरी पेडणेकर यांची 15 मिनिटं चौकशी झाली आहे. आज पुन्हा त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे. ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची दादर पोलिसांकडून एसआरए घोटाळ्याप्रकरणी चौकशी करण्यात आली. आज पुन्हा किशोरी पेडणेकर यांची एसआरए घोटाळ्याप्रकरणी त्यांची चौकशी दादर पोलिस ठाणे येथे करण्यात येणार आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या यांनी एसआरए घोटाळ्याप्रकरणी किशोरी पेडणेकरांवर गंभीर आरोप केले होते. किरीट सोमय्यांच्या आरोपानंतर दादर पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले आहे.

संबंधित बातम्या

एसआरएमध्ये फ्लॅट देण्याच्या नावाखाली झालेल्या फसवणुकीत जून महिन्यात दादार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली होती. त्यांची चौकशी करण्यात आली. या व्यक्तींनी पोलीस चौकशीमध्ये माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचं नाव घेतलं आहे. याचप्रकरणी शुक्रवारी त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं. यावेळी त्यांची 15 मिनिटं चौकशी झाली असून आज त्यांना पुन्हा एकदा चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितलंय. (‘जगात जे काही घडले ते सरकार आल्यामुळेच’ शिवसेनेनं उडवली शिंदे सरकारची खिल्ली) दरम्यान, ‘दरम्यान, ‘किशोरी पेडणेकरना आज पुन्हा दादर पोलीस स्टेशन यावे लागणार आहे. दादर पोलीस स्टेशन १२ एसआरए फ्लॅट्सच्या फसव्या विक्री, किश कॉर्पोरेट कंपनी विरुद्ध मरीन लाईन्स पोलीस स्टेशनची चौकशी सुरू आहे. वरळी 6 SRA फ्लॅटच्या बेकायदेशीर ताबा , किश कॉर्पोरेटला बीएमसी कोविड कॉन्ट्रॅक्ट, माझी हायकोर्टात याचिका दाखल’ अशी टीका भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी केली आहे. (25 पैशांच्या नाण्यावर राणेंचा फोटो, भाजप आक्रमक, पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल) तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्यांमागं गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या यंत्रणांच्या चौकशीचा ससेमिरा लागला. संजय राऊत हे पत्राचाळ प्रकरणात अटकेत आहेत. सध्या त्यांचा मुक्काम आर्थर रोड जेलमध्ये आहे. दुसरीकडं अनिल परब दापोलीच्या रिसॉर्ट प्रकरणात ईडी आणि केंद्रीय पर्यावरण खात्याच्या रडारवर आहेत. त्यांची मंत्रिपदावर असताना यापूर्वी ईडी चौकशी झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातले आमदार वैभव नाईक यांची बेनामी मालमत्ता प्रकरणात रत्नागिरी एसीबीनं चौकशी केली आहे. त्यांची चौकशी अजूनही पूर्ण झालेली नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या