JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / महाविकास आघाडीच्या बैठकीत ठरला भाजपला चित करण्याचा प्लान, जयंत पाटील म्हणाले..

महाविकास आघाडीच्या बैठकीत ठरला भाजपला चित करण्याचा प्लान, जयंत पाटील म्हणाले..

ते म्हणाले, सुप्रीम कोर्टात फार काही होईल असं वाटत नाही. अगोदर अपेक्षा होती, पण आता तसं काही वाटत नाही.

जाहिरात

सुप्रीम कोर्टाने जर पक्ष विरोधी कारवाई करणाऱ्या आमदारांना निलंबित केलं तर शिंदे सरकार कोसळले आणि त्यानंतर

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 23 ऑगस्ट : आज महाविकास आघाडीच्या बैठकीत अजित पवार, जयंत पाटील, नाना पटोले, उद्धव ठाकरेंसह अनेक नेत्यांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी पुढील तयारीची चर्चा करण्यात आली. शिवसेना नेमकी कुणाची, याबाबत अद्यापही सुप्रीम कोर्टात तारीख पे तारीख सुरू आहे. याबाबत जयंत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, सुप्रीम कोर्टात फार काही होईल असं वाटत नाही. अगोदर अपेक्षा होती, पण आता तसं काही वाटत नाही. आपण जेवढे आक्रमक होवू तेवढेच समोरचे संरक्षणात जातील. आपण एकसंध राहिलो, विधानभवनातही चांगले काम केले तर मला खात्री आहे की यश नक्की मिळेल. शिवसेनेत आमदार, खासदार सोडले तर बाकी कशातही बदल झालेला नाही. शिवसैनिक आहे तसाच आहे, मुंबई महापालिकेत जर भाजपला पराभव स्विकारावा लागला तर महाराष्ट्रतही वेगळे चित्र पाहायला मिळेल, असंही जयंत पाटील यावेळी म्हणाले. शरद पवार आज दिल्लीत आहे. त्यांनीही आपल्या भाषणात सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज व्यक्त केली. दिल्ली येथे राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यक विभागाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. मनीष सिसोदिया प्रकरणावरुन शरद पवारांनी काँग्रेसला सुनावलं, म्हणाले इथं तर.. काय म्हणाले शरद पवार? देशातील वेगवगळ्या धर्मांच्या लोकांना एकत्र आणण्यासाठी पक्षाची भूमिका महत्वाची असणार आहे. देशात सध्या विचित्र स्थिती आहे. लोकशाहीमध्ये जनतेनं निर्णय घेतला. पण यांच्यामुळे देशात समस्या निर्माण झालेल्या आहेत. भाजपचे नेते सांगतात वेगळे आणि करतात वेगळे अशी स्थिती आहे. पूर्ण देशात काय स्थिती आहे. महाराष्ट्रात भाजपची सत्ता नव्हती. पण, शिवसेनेतील एका गटाला सोबत घेवून सत्ता आणली. देशात 70 टक्के देशात भाजपची सत्ता नाही. 2024 मध्ये देशाचा नकाशा बदलू शकतो. फक्त मिळून लढण्याची गरज असल्याचं पवार म्हणाले. उद्धव ठाकरे यावेळी काय म्हणाले?  - जगभरात संकट होतं तेव्हा आपल्याला सत्ता मिळाली आणि आता कोरोना गेल्यावर यांनी सत्ता हुस्कावली. -पण आपल्याला संघर्ष करायचा आहे. संघर्षाला आपण मागे हटणार नाही. -मी फार अधिवेशनात उपस्थित राहत नाही. कारण इथलं गांभीर्य राहिलेलं नाही. सदनाची परंपरा रसातळाला गेली आहे. -मागच्या अडीच वर्षात अजित दादांनी आर्थिक गाडा ज्यापद्धतीने सांभाळला त्याचं कौतुक आहे. -जर कोरोना काळात जीव वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. तरी आम्ही कामं केली नाही असं जर म्हणत असतील तर त्याला अर्थ नाही. -हे सरकार खोके सरकार आहे..

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या