JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'मी फिक्स मॅच पाहत नाही' महामुलाखतीवरून फडणवीसांचा उद्धव ठाकरेंच्या टोला

'मी फिक्स मॅच पाहत नाही' महामुलाखतीवरून फडणवीसांचा उद्धव ठाकरेंच्या टोला

जो सामना खरा आहे, तो पाहत असतो. पण जी फिक्स मॅच आहे, ती पाहून त्यावर काय प्रतिक्रिया द्यायची?

जाहिरात

जो सामना खरा आहे, तो पाहत असतो. पण जी फिक्स मॅच आहे, ती पाहून त्यावर काय प्रतिक्रिया द्यायची?

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 26 जुलै : शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीतून रोखठोक भूमिका मांडली असून शिंदे गटावर जोरदार आसूड ओढला आहे.  पण,‘मी फिक्स मॅच पाहत नाही. मी लाईव्ह मॅच पाहत असतो. खरी मॅच पाहत असतो. पण जी फिक्स मॅच आहे, ती पाहून त्यावर काय प्रतिक्रिया द्यायची?  अशी खोचक प्रतिक्रिया भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. उद्धव ठाकरे यांची महामुलाखत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. या मुलाखतीमुळे शिंदे गट आणि भाजपच्या गोटात चांगलीच खळबळ उडाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शैलीत या मुलाखतीवर प्रतिक्रिया दिली आहे. ‘मी फिक्स मॅच कधी पाहत नाही. मी पाहतो तर लाईव्ह मॅच पाहत असतो. जो सामना खरा आहे, तो पाहत असतो. पण जी फिक्स मॅच आहे, ती पाहून त्यावर काय प्रतिक्रिया द्यायची? काही दिवासांनी काही गोष्टी स्पष्ट होतील, त्यानंतर पाहू, असं म्हणत फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. सोनिया गांधी यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. याविरोधात काँग्रेसची आंदोलनं ही निरर्थक आहे. मुळात आम्हीही काही तरी केलंय. आम्हीही तुमच्या पाठी आहोत. भविष्यात आम्हालाही काही तरी द्या. एवढंच सांगण्यासाठी ते आंदोलन आहे. बाकी त्यात काही नाही. त्यामुळे त्याकडे लक्ष द्यायची गरज नाही, असा टोला फडणवीस यांनी लगावला.

(VIDEO : अभिनेता रणवीर सिंह अडचणीत; ‘या’ कारणामुळे जाणार तुरुंगात?)

दरम्यान,शिवसेनेत बंडखोरीनंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीतून शिंदे गटावर टीका केली होती. उद्धव ठाकरेंच्या टीकेला आता भाजपचे नेते आशिष शेलार आणि प्रवीण दरेकर यांनी उत्तर दिले आहे. ‘2014 ला देखील या कपटी वृत्तीमुळे फोडाफोडी केली. अमित शहा तुमच्या निवासस्थानी आले आणि काय बोलले ते जाहीरपणे सांगा. 2014 ला आमच्यासोबत सत्तेत होता पण रोज रुसणं, राजीनामा खिशात ठेवले. 2017 ला युतीत मी सडलो हे कोण म्हणाले. 2019 ला कुणाचे फोटो लावून मते मागितली. मोदींच्या नेतृत्वाने तुम्ही तरलात आता कुणाला सांगता, असा सवाल शेलार यांनी केला. विश्वासघाताचा पहिला अंक शरद पवार यांच्यानंतर कुणी केला असेल तर तो उद्धव ठाकरे यांनी केला आहे. राज्यातील जनता याला भुलणार नाही. निवडणुकीला सामोरे जायचे म्हणता तर तुम्हाला आधी राजीनामा द्यावा लागेल. जे आता 40 आमच्यासोबत आलेत त्यांनी युतीसोबत मते मिळवली. तुम्हाला चॅलेंज आहे जे 12 ते 13 तुमच्यासोबत आहेत त्यांनी राजीनामे द्यावे आणि दोन हात करावे, असं आव्हानच शेलारांनी दिलं. ( भारतभर भटकंती करणाऱ्यांसाठी ‘या’ ठिकाणी फ्रीमध्ये राहण्याची सोय, चेक करा लिस्ट ) तर ‘आपल्या पक्षाची पडझड होत असताना अशा पद्धतीने आजारपणाचे भांडवल केले सहानुभूती मिळाली असती परंतु तुम्हाला संपत्ती मिळवायची होती. पालवी प्रत्येक गोष्टीला फुटते त्यांनी पाणी घातले त्यांच्या कष्टाचे वैभव म्हणून तुम्हाला मुख्यमंत्रिपद मिळवले या लोकांना तडीपारी झाली. त्यांना पालापाचोळा बोलणे हे चुकीचे आहे, अशी टीका दरेकरांनी केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या