JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Mumbai : 'बबल टी' म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे का? पाहा काय आहे वेगळेपण Video

Mumbai : 'बबल टी' म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे का? पाहा काय आहे वेगळेपण Video

मुंबईतील 22 वर्षांच्या तरुणाने देश - विदेशात मिळणारा अनेक प्रकारचा चहा टेस्ट करून पाहिला आणि त्याला त्याचं पेटंट मिळालं. परदेशात विकला जाणारा ‘बबल टी’ त्यानं थेट मुंबईत आणला.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

loमुंबई, 31 ऑक्टोबर : घरी आल्यावर पाहुण्यांचं स्वागत हे चहानं केलं केलं जातं. राज्यातील सर्व गावांमध्ये चहाची टपरी असते.  चहाच्या या व्यवसायाला आता संघटित स्वरूप प्राप्त झालं आहे. ‘अमृततुल्य’ या प्रकारातील अनेक चहा राज्यात मिळतात. त्याचबरोबर त्यामध्ये संशोधन करून हा व्यवसाय आणखी मोठ्या प्रमाणात करण्याचं काम काही जण करत आहेत. मुंबईतील 22 वर्षांच्या तरुणाने देश - विदेशात मिळणारा अनेक प्रकारचा चहा टेस्ट करून पाहिला आणि त्याला त्याचं पेटंट मिळालं. परदेशात विकला जाणारा ‘बबल टी’ त्यानं थेट मुंबई त आणला. हा बबल टी कसा असतो हे जाणून घेऊया. बबल टी म्हणजे काय? रितिक सिन्हा या 22 वर्षांच्या मुंबईकर तरूणाने बबल टी हा प्रकार मुंबईत आणला आहे.  या चहाची संकल्पना विदेशी आहे. इजिप्त, सिंगापूरसह अनेक देशांमध्ये हा चहा लोकप्रिय आहे. चहाप्रमाणेच कॉफी आणि मिल्क शेक देखील बबल मिसळून बनवला जातो. त्यालाही विदेशात चांगली मागणी आहे. सिन्हा यांनी सामान्य नागरिक, कॉलेजमधील तरूण यांच्या पॉकेट मनीला परवडेल या दरात बबल टी, बोबा शेक कॉफी उपलब्ध करून देण्याचे ठरवले. त्यासाठी त्याने अनेक ठिकाणी भेटी दिल्या. त्या भेटीमध्ये या विषयाचा सविस्तर अभ्यास करुन बबल टी विक्री सुरू केली. संपूर्ण मुंबई पालथी घातली तरी ‘असा वडापाव’ मिळणार नाही, पाहा Video बबल टी कसा बनतो? वेगवेगळ्या फळांच्या फ्लेवर्सच्या जेली बेस बबलमध्ये हा चहा मिळतो. तुम्हाला वाटेल यात दूध असेल गरम पाणी असेल मात्र असे काहीही नसते. बबल, सोडा, चहा असे विविध पदार्थांचे लेयर एका ग्लासमध्ये टाकले जातात. यात टाकलेले बबल हे खूप नाजूक असतात ते फुटणार नाहीत अशा तापमानात  ठेवले जातात. चहा ढवळताना सुद्धा त्याची विशेष काळजी घेतली जाते.  विशेष मापाचा स्ट्रॉ टाकून तो ग्राहकांना दिला जातो. हा चहा थंड असल्यामुळे तो स्ट्रॉच्या माध्यमातून पितात. स्ट्रॉमधून चहा आणि बबल जेव्हा तोंडात फुटतो तेव्हा विशेष फ्लेवर तोंडात येतो. आईस टीच्या धरतीवरच बबल टी बनवला जातो मात्र यात एक वेगळेपण असतं. काय आहे किंमत? या चहाची किंमत बाहेरच्या नावाजलेल्या कॅफेमध्ये 200 पासून सुरवात झालेली पाहायला मिळते.  सिन्हा यांनी  त्यांच्या कॅफेत या चहाची किंमत 169 रुपये ठेवली आहे. तसेच इतर कॅफेमध्ये मिळणाऱ्या महागड्या कॉफीचे प्रकार 99 रुपयांत उपलब्ध आहेत. Video : मुंबईत मिळतोय अनोखा पिझ्झा, ‘हा’ प्रकार तुम्ही खाल्लाच नसेल !

गुगल मॅपवरून साभार

संबंधित बातम्या

बबल टी कोणत्या कॅफेत मिळतो? बबल टी मुलुंड मध्ये ब्रिव केमिस्ट्री या कॅफेत मिळतो. या कॅफेत कॉफी आणि चहाचे वेगवेगळे प्रकार मिळतात. 22 व्या वर्षी व्यवसाय सुरु करताना अनेकांनी कौतुक केलं अनेकांनी निगेटिव्ह गोष्टी सांगितल्या पण विदेशात मिळणाऱ्या महागड्या चहा व त्यांचे प्रकार स्वस्त दरात मुंबईत मिळाले तर सगळ्यांना त्याचा आनंद घेता येईल याचा अभ्यास करून मी हा कॅफे सुरु केला आहे.असं रितिक सिन्हा यांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या