मुंबई, 4 सप्टेंबर : टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा आज पालघर येथे अपघातात मृत्यू झाला आहे. या वृत्तामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. ते मर्सिडिज कारमध्ये होते. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर चारोटी येथे हा अपघात घडला. गाडीत एकूण चार जणं असल्याची माहिती समोर आली आहे. सायरस मिस्त्री यांच्यासह एकाचा मृत्यू तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी वापी येथे हलवण्यात आलं आहे.
गेल्या वर्षी मार्च महिन्यात सुप्रीम कोर्टाने टाटा सन्सला सर्वात मोठा दिलासा देत सायरस मिस्त्री यांना अध्यक्षपदावरुन हटवण्याचा निर्णय कायम ठेवला होता. गेल्या अनेक वर्षांपासून टाटा सन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि सायरस इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेडमध्ये न्यायालयीन संघर्ष सुरू होता. हे वाचा : Cyrus Mistry Death : ना जाळून, ना दफन करून, पारशी समाजात असा होतो अंत्यसंस्कार विधी
हा अपघात इतका भयंकर होता की, त्यांच्या महागड्या मर्सिडीच गाडीचा चेंदामेंदा झाला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे.
हा अपघात इतका भीषण होता की, सायरस मिस्त्री यांचा जागीच मृत्यू झाला.