मुंबई 01 ऑगस्ट : शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीने मध्यरात्रीनंतर अटक केली आहे. संजय राऊतांची रविवारी सकाळपासून चौकशी सुरु होती. राऊतांविरोधात चौकशी करण्यासाठी दिल्लीहून ईडीचे पथक आले होते. ईडी अधिकाऱ्यांची तीन पथकं संजय राऊतांविरोधात तपास करत होते. अखेर मध्यरात्री त्यांना अटक करण्यात आली. यावर आता संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांनी प्रतिक्रिया केली आहे. त्यांनी ईडीवर गंभीर आरोप केले आहेत. मी अखेरपर्यंत.. ईडीने ताब्यात घेतल्यानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले.. संजय राऊत हे पत्राचाळ घोटाळा प्रकरणात ईडीच्या जाळ्यात अडकले आहेत. जवळपास 1034 कोटींचा हा घोटाळा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, खोटी केस तयार करून संजय राऊतांनी अटक करण्यात आल्याचा आरोप सुनील राऊत यांनी केला आहे. यात पत्राचाळीचा उल्लेख कुठेही नसल्याचंही त्यांचं म्हणणं आहे. सकाळी 9 वाजता राऊतांना वैद्यकीय चाचणीसाठी जे जे रुग्णालयात नेण्यात येणार आहे. त्यांची तब्येत एकदम ठीक आहे. ही खोटी केस दाखवली असून लवकरच संजय राऊत बाहेर येतील. आम्ही न्यायालयीन लढाई लढू, असंही सुनील राऊत म्हणाले. संजय राऊत आणि शिवसेनेचा आवाज दाबवण्यासाठी ही खोटी कारवाई केली गेली आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. संजय राऊत यांना अखेर ईडीची अटक! ‘या’ दोन कारणामुळे कारवाई केल्याची माहिती रविवारी सकाळपासून काय घडलं - संजय राऊत यांची सलग नऊ तास चौकशी केल्यानंतर हालचालींना वेग आला. त्यांच्या घराबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. राऊतांच्या भांडूप आणि दादर या दोन्ही घरांच्या बाहेर पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला होता. त्याचबरोबर मुंबईतील बलार्ड पिअर भागातील ईडी कार्यालयाजवळ मोठा पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. अतिशय जलद वेगाने घडामोडी घडत होत्या. त्यामुळे राऊतांना आता अटक होणार अशी शक्यता वर्तवली जात होती. अखेर ईडीने त्यांना अटक केली आहे. ईडीला तपासात सहकार्य न करणे आणि घरातून बेहिशेबी रोकड सापडल्याने त्यांना अटक केल्याची माहिती आहे.