ऋतुजा लटके राजीनामा प्रकरण
मुंबई 13 ऑक्टोबर : ऋतुजा लटके यांचा राजीनामा BMC कडून स्वीकारला गेलेला नाही. ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर झाला नाही, तर त्यांची उमेदवारी अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. यामुळे ऋतुजा लटके यांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. आज या याचिकेवर सुनावणी होत आहे. BMC आणि ऋतुजा लटके यांच्या वकीलांचे युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायलयाने बीएमसीला आपला निर्णय कळवण्याकरता अडीच वाजेपर्यंतचा वेळ दिला आहे. दरम्यान आतापर्यंतच्या सुनावणीत कोर्टात नेमकं काय घडलं ते जाणून घेऊ ‘तुम्ही भेदभाव करताय, आमची रणनीती तुम्हीच उघड केली’; ठाकरे गटाचे निवडणूक आयोगावर 12 ‘बाण’ विश्वजित सावंत (ऋतुजा लटके यांचे वकील) यांचा युक्तिवाद - - पहिल्या पत्रात ऋतुजा लटके यांनी राजीनामा कारण स्पष्ट केलं होतं - दुसऱ्या पत्रात इतर फॉर्मलिटी स्पष्ट केल्या - निवडणूक लढवण्यासाठी राजीनामा अट शिथिल करावी ही मागणी योग्य - राजकीय चळवळीत भाग घ्यायचा असेल तर राजीनामा देणं आवश्यक - क्लार्क पोस्ट ही थेट कमिशनर यांच्याकडे मंजुरीसाठी जाण्याचं कारणच काय ? - ही पोस्ट इतकी महत्वाची नाही - नियमानुसार पालिका कोषागारात पगार रक्कम भरली - 1 महिना नोटीस कालावधी पूर्ण होत असतानाही 1 महिना पगार रक्कम भरणं आवश्यक - राजीनामा कारण पहिल्या पत्रात स्पष्ट केलं होतं - 1 महिना नोटीस कालावधी हा कर्मचाऱ्याच्या हिताचा मानला जातो - जर त्याचं मत बदललं तर त्याला राजीनामा मागे घेता यावा म्हणून हा कालावधी असतो - 1 महिन्याचा कालावधी टाळण्यासाठी नियमाने आवश्यक रक्कम भरली होती - मात्र तुमचा राजानाम्याचा अर्ज पालिका आयुक्तांकडे प्रलंबित असल्याचं सांगत तो मंजूर झालेला नाही - मुळात या पदावरील कर्मचा-याचा राजीनामा आयुक्तांपर्यंत जातच नाही - तो सहआयुक्त स्तरावरच पास केला जातो - मात्र राजकीय दबावापोटीच तो थांबवण्यात आला Andheri Byelection: ‘ऋतुजा लटकेंविरोधात अनिल परबांनीच रचला डाव’, राजीनामा प्रकरणात मनसेचा गंभीर आरोप अनिल साखरे (BMC चे वकील) यांचा युक्तिवाद - लटके यांनी सादर केलेला राजीनामा योग्य स्वरूपात नाही त्यावर रितसर निर्णय देण्यास वेळ लागणं स्वाभाविक आहे केवळ एका महिन्याचा पगार जमा केला, म्हणून राजीनामा तातडीनं स्वीकारावा अशी मागणी करणं चुकीचं दोन्ही बाजूचे युक्तीवाद ऐकल्यानंतर कोर्टानं BMC वकिलांना असा प्रश्न केला की, एखाद्या कर्मचाऱ्याला जर निवडणूक लढवायची आहे तर त्यात तुम्हाला अडचण काय? कोर्टाने BMC वकिलांना म्हटलं की, तुम्ही निर्णय घेणार आहात की नाही ते कळवा. BMC प्रशासनासोबत चर्चा करून तुमचा निर्णय कळवा. त्यानंतर आम्ही तुमची बाजू ऐकू. BMC वकिलांना कोर्टानं दुपारी अडीचपर्यंतची वेळ दिली आहे. -